Menu Close

रेल्वेमध्ये हिंदु प्रवाशांना हलालऐवजी झटका मांस उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर रेल्वे प्रशासनाचे टोलवाटोलवीचे उत्तर !

रेल्वेमध्ये हिंदूंवर हलाल मांसाची सक्ती का ? – डॉ. सचिन बोधनी, प्रवासी

‘हलाल’ ही प्रक्रिया इस्लामशी संबंधित असल्याने अशा हलालची हिंदूंना सक्ती करणे, हे राज्यघटनेने दिलेल्या कलम २५ आणि २७ नुसार धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघनच होय. या विरोधात आता हिंदु जनतेने आवाज उठवला पाहिजे ! – संपादक 

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – कामाख्या-कोलकाता वन्देे भारत एक्सप्रेस आणि रेल्वेच्या अन्य उपाहारगृहांत हिंदु प्रवाशांना त्यांच्या संमतीविना हलाल मांस खायला दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या विरोधात एक प्रवासी डॉ. सचिन बोधनी यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून हिंदूंसाठी झटका मांसाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर ‘भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम् कॉर्पोरेशन – आय.आर्.सी.टी.सी.) यांनी दिलेले उत्तर अत्यंत मोघम असून त्यात हिंदूंच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

काय होते डॉ. बोधनी यांचे पत्र ?

डॉ. बोधनी यांनी पत्रात स्पष्ट केले होते की, हलाल पद्धत ही केवळ एका विशिष्ट धर्माची असून ती सार्वजनिक ठिकाणी लादणे, हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे, तसेच हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर गदा आहे. ‘वन्दे भारत’सारख्या गाड्यांमध्ये हिंदु प्रवाशांची संख्या मोठी असल्याने त्यांना झटका मांसाचा पर्याय मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे.

आय.आर्.सी.टी.सी.चे उत्तर आणि त्यातील त्रुटी !

डॉ. बोधनी यांच्या पत्राला उत्तर देतांना आय.आर्.सी.टी.सी.च्या समूह महाप्रबंधकांनी म्हटले आहे की, ‘आमच्याकडून प्रवाशांना जे अन्न पुरवले जाते, ते सरकाराच्या ‘अन्न सुरक्षा कायद्या’च्या (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’च्या) नियमांनुसार असते.’ झटका किंवा हलाल मांसाच्या प्रश्‍नावर थेट उत्तर न देता त्यांनी केवळ ‘आम्ही सरकारी नियमांचे पालन करतो’, असे तांत्रिक उत्तर दिले आहे. रेल्वे प्रशासन खाद्य सुरक्षिततेविषयी बोलत असले, तरी हिंदूंच्या धार्मिक भावना आणि हलालच्या सक्तीविषयी मौन बाळगून आहे. केवळ सरकारी नियमांचा संदर्भ देऊन हिंदूंच्या अस्मितेच्या प्रश्‍नावर रेल्वे प्रशासन वेळ मारून नेत असल्याचे या उत्तरातून स्पष्ट होत आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Latest News