Menu Close

युवतींच्या सुरक्षिततेसाठी पंढरपूरमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षण शिबिर !

प्रशिक्षण शिबिरामध्ये कराटेचे प्रकार करतांना सहभागी युवती

 

पंढरपूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कोर्टी (पंढरपूर) येथील मुलींच्या वसतीगृहात स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. समितीच्या युवती प्रशिक्षक कु. शिवलीला गुब्याड यांनी कराटेचे सोपे प्रकार, छेडछाडीच्या प्रसंगी वापरता येणारी बचाव तंत्रे, तसेच दैनंदिन वस्तूंच्या साहाय्याने स्वतःचा बचाव कसा करावा ? याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी युवती
समितीच्या युवती प्रशिक्षक कु. शिवलीला गुब्याड कराटेचे प्रकार दाखवतांना

या शिबिराचा पुष्कळ युवतींनी लाभ घेतला. दैनंदिन जीवनात मन आणि मनगट दोन्ही बळकट असणे आवश्यक असल्याचे सांगत राणी लक्ष्मीबाई अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले. शिबिराच्या शेवटी दंडसाखळीची (नानचाकू) प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शिबिरामुळे आत्मविश्वास वाढल्याची भावना सहभागी युवतींनी व्यक्त केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. यश मुगड्याल, वसतीगृह संचालिका सौ. अदिती कांबळे, तसेच महाविद्यालयाच्या शिक्षिका स्मिता माळी, वनिता चव्हाण, पुष्पांजली जुगल आणि निकिता राजमाने उपस्थित होत्या. शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांनी सहकार्य करून समितीचे आभार मानले.

Read more on Self defence

Latest News