चतुःश्लोकी भागवत – अनुतापयुक्त ब्रह्मदेव

अनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं त्या चित्तशुद्धीलागीं जाण । भावें करावें भगवदभजन । कां गुरुदास्य करितां पूर्ण । परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥ ते घडावया भगवदभक्ती । तपादिसाधन सुयुक्ती । देव सांगे ब्रह्मयाप्रती । ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥ एवं कमलासनीं ब्रह्मा आपण । बैसलासे अनुतापें पूर्णं । तंव एकार्णवी निकट जाण । … Read more

चतुःश्लोकी भागवत – तपाचें महिमान

नवल तपाचें कौतुक । तापसां भिती ब्रह्मादिक । तपस्वियाचें नवल देख । दशावतारादिक विष्णूसी ॥९१॥ तपाचेनि नेटपाटी । सूर्यमंडळ तपे सृष्टी । तयाच्या बळें निजनेटीं । दर्भाग्रीं सृष्टी धरिती ऋषि ॥९२॥ तपोबळें समुद्रा क्षार केलें । यादवकुळ निर्दाळिलें । शिवाचें लिंगपतन झालें । क्षोभलेनी बोलें तपोधनी ॥९३॥ जे सत्यवादी संत सज्जन । जे वासनात्यागी अकिंचन … Read more

चतुःश्लोकी भागवत – चित्तशुद्धी

चित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं त्यासी द्यावी आपुली भेटी । कृपा उपजली हरीचे पोटी । नव्हती चित्तशुद्धि गोमटी । ह्नणुनी हरिरुपी दृष्टी रिघेना ॥७९॥ जरी ह्नणाल बहुत दूरी । इंद्रियां तो व्यापारी । निजज्ञानें नांदे श्रीहरी । घडे कैशापरी प्राणिया प्राप्ती ॥८०॥ इंद्रियव्यापार ज्ञानेंहोती । तें ज्ञान वेंचलें विषयासक्तीं । या लागीं हदयस्थाची प्राप्ती । प्राणी … Read more

चतुःश्लोकी भागवत – हरिकृपा

हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं । त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥ विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं । कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥ विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें । हें एकएका अवेगळें । … Read more

चतुःश्लोकी भागवत – भगवंताचा धांवा

किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा कृपा करी गा अच्युता । धांवे पावे गा भगवंता । या एकार्णवाआंतोता । होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥ मी अतिशयें तुझें दीन । मजवरी कृपा करी संपूर्ण । निजभावें अनन्यशरण । मनी लोटांगण घालितसे पैं ॥७०॥ ऐसी ब्रह्मयाची ती चिंता । तत्काळ कळली भगवंता । तो अंतर्यामी जाणता । करता करविता … Read more

चतुःश्लोकी भागवत – तप म्हणजे काय

तप म्हणिजे नव्हे स्नान । तप म्हणिजे नव्हे दान । तप नव्हे शास्त्रव्याख्यान । वेदाध्ययन नव्हे तप ॥६॥ तप म्हणिजे नव्हे योग । तप म्हणिजे नव्हे याग । तप म्हणिजे वासनात्याग । जेणें तुटे लाग कामक्रोधांचा ॥७॥ शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरुप । हरि हदयीं चिंतणें चिद्रूप । तप सद्रूप त्या नांव पैं ॥८॥ … Read more

चतुःश्लोकी भागवत – तप आरंभिलें

कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें मनुष्याचा जो जाणिजे मास । तो देवांचा एक दिवस । ऐसी संख्या सहस्त्रवरुष । तपसायास करी ब्रह्मा ॥१५॥ ऐसी सहस्त्ररुषेंवरी । ब्रह्मया कमलासनी तप करी । त्याच्या तपाची थोरी । व्यासमुनीश्वरीं वर्णिली ॥१६॥ हे आदिकल्षींची जुनाट कथा । होय श्रीव्यासचि वक्ता । तेणें आणोनियां वेदार्था । यथार्थ वार्ता निरुपिली ॥१७॥ तीच … Read more

चतुःश्लोकी भागवत – आत्मज्ञान

गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं न होतां गुरुकृपा संपूर्ण । कदा न साधे आत्मज्ञान । त्या गुरुत्वालागी नारायण । आपुलें आपण स्वरुप दावी ॥५०॥ नसेवितां सदगुरुचरण । स्रष्टयासी नव्हे ब्रह्मज्ञान । त्या गुरुत्वाचें महिमान । श्रीनारायण स्वये दावी ॥५१॥ मागे उपदेशिलें ‘ तप तप ’ । परी प्रत्यक्ष नव्हे सदगुरुरुप । गुरुकृपा नव्हतां सद्रूप । शिष्याचे विकल्प … Read more

चतुःश्लोकी भागवत – पतिव्रतांचें निवासस्थान

पतिव्रतांचें निवासस्थान जे शुद्धसत्वेंकरुनी संपन्न । नुल्लंघत पतीचें वचन । जे निर्विकल्प पतिव्रता पूर्ण । तिसी निवासस्थान वैकुंठ ॥९०॥ जे पतिपुत्रा आणि अतीता । भोजनी न देखे भिन्नता । जे घनलोभाविण पतिव्रता । ते जाण तत्त्वतां वैकुंठवासी ॥९१॥ जे पतीतें मानी नारायण । जे कोणाचे न देखे अवगुण । जे निर्मोह पतिव्रता पूर्ण । तिसी … Read more

हरिगुणसंकीर्तन

स्वानंदधुंद रमेकडून हरिगुणसंकीर्तन ऐसें ऐकतां हरिगुण । रमा झाली स्वानंदें पूर्ण । तेही संतोषोनी आपण । अगाध त्याचे गुण गाऊं लागली ॥८॥ ऐकतां हरिनामगुणकीर्ति । ज्यासी उल्हास नुपजे चित्ती । तो परम अभाग्य त्रिजगतीं । जाण परीक्षिती निश्चित तूं ॥९॥ मी हरीचें निजअर्धांग । ह्नणें परी नदेखें अंगसंग । सांग नाहीं ह्नणती श्रीरंग ॥ व्यापुनी … Read more