चतुःश्लोकी भागवत – भगवंताचा धांवा

किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा

कृपा करी गा अच्युता । धांवे पावे गा भगवंता ।
या एकार्णवाआंतोता । होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥

मी अतिशयें तुझें दीन । मजवरी कृपा करी संपूर्ण ।
निजभावें अनन्यशरण । मनी लोटांगण घालितसे पैं ॥७०॥

ऐसी ब्रह्मयाची ती चिंता । तत्काळ कळली भगवंता ।
तो अंतर्यामी जाणता । करता करविता तो एक ॥७१॥

Leave a Comment