परीक्षेच्या काळात संतुलीत आहार घ्या आणि योग्य व्यायाम करा !

अ. संतुलीत आहार आणि पुरेसा व्यायाम या विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपीच करण्याच्या गोष्टी आहेत; परंतु परीक्षेच्या काळात त्याची विशेष काळजी घ्यायला हवी !

आ. परीक्षेच्या काळात हलका फुलका आणि सात्त्विक आहार घ्या. त्यामुळे मनाचे आणि शरीराचे आरोग्य चांगले राहून अभ्यास करायला उत्साह वाटेल .

इ. रात्रीची जागरणे टाळा. त्यामुळे उष्णतेचे विकार टळतील.

ई. सूर्यनमस्कार, योगासने, श्वसनाचे व्यायाम किंवा दीर्घश्वसन, ॐकार किंवा मैदानी खेळ यांपैकी जमतील ते व्यायाम करा !

उ. डोळ्यांवर ताण येऊ नये, यासाठी नेत्रस्नान, थंड पाण्याने डोळे धुणे, डोळ्यांचे व्यायाम इ. रोज करा ! अभ्यास करतांना मधून मधून थोडा वेळ थांबून डोळे १ ते २ मिनिटांसाठी बंद करा आणि एखाद्या वस्तूवर ध्यान करा किंवा दूरच्या एखाद्या वस्तूवर दृष्टी स्थिर करा.

ऊ. थकलेल्या मेंदूला विश्रांती देण्यासाठी पुरेशी झोप घ्या !

ए. मेंदूच्या पेशींना पोषक अशा दूध, तूप, भिजवलेले बदाम आदी पदार्थांचे सेवन करा !

ऐ. मानसिक ताण येण्याचे प्रसंग टाळा !

संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ ‘ अभ्यास कसा करावा? ‘

Leave a Comment