मनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा !

या जगात सगळ्यात जोरात धावणारं काही असेल तर ते म्हणजे आपलं मन. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला मनाला एक सेकंद सुद्धा खूप झाला. विचारांची धावती आगगाडी तर आपण सगळ्यांनी कधीतरी अनुभवली असेलच. या विचारांच्या गर्दीमुळे मात्र एक गोष्ट आपल्या नकळत आपल्याकडून होत असते. ती म्हणजे मन विचलित होणे, अर्थात मन एकाग्र नसणे. आपल्याला ज्ञात असलेली सर्व माहिती अन् आपली स्वभाववैशिष्ट्ये आपल्या अंतर्मनात साठवलेली असतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पंचज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला बाह्य जगाचे ज्ञान होते. मग त्याच्या संदर्भात आपल्या मनात विचार येतात.  एखादे दृश्य दिसले की, त्याच्या संदर्भातही आपल्या मनात विचार येतात. एखादा मुलगा भावनाप्रधान असेल, तर त्याच्या मनात पुढील प्रकारे विचारमालिका चालू होते – भावाने चिडवल्याची आठवण – आई भावावर ओरडल्याचा प्रसंग – बाबा – शेजारी इत्यादी. थोडक्यात अभ्यासाचे पुस्तक दृष्टीसमोर असले, तरी मनात इतर विचार येतात. त्यामुळे मन अभ्यासावर एकाग्र होऊ शकत नाही. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी काय करायला पाहिजे हे पुढे पाहूया.

१. शांत वातावरणात अभ्यासाला बसावे !

अ. अभ्यास करतांना शक्यतो मन इतरत्र ओढून नेणाऱ्या बाह्य गोष्टी भोवताली नसाव्यात, उदा. ‘म्युझिक सिस्टिम’ विंâवा दूरचित्रवाणी-संच नसेल, अशा खोलीत अभ्यास करावा.

आ. अभ्यासिका विंâवा वाचनालयात अभ्यासाला बसावे.

२. अभ्यास करतांना मध्ये व्यत्यय येऊ देऊ नये !

अ. अभ्यास करतांना मध्ये मध्ये उठायला लागू नये, यासाठी ‘मी आता अभ्यासाला बसत आहे’, असे अभ्यासाला बसण्यापूर्वीच घरच्यांना सांगावे; जेणेकरून त्यांना काही कामे सांगायची असतील, तर ते नंतर सांगू शकतील आणि अभ्यास सलग काही वेळ बसून करता येईल.

आ. अभ्यासाच्या वेळी शक्यतो एकटे बसावे विंâवा सोबत कोणी असल्यास सहज बोलता येईल, इतक्या अंतरावर न बसता दूर दूर बसावे. यामुळे अभ्यासाच्या मध्ये अनावश्यक बोलणे होत नाही.

३. अभ्यासाचा विषय पालटावा

प्रत्येक १०-१५ मिनिटांनी अभ्यासाचा विषय पालटावा. नंतर अनुक्रमे १, २ आणि ४ घंट्यांनी (तासांनी) विषय पालटत नेला, तरी चालतो. शेवटी एकाच विषयाचा कित्येक दिवसही अभ्यास करता येतो.

४. शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवावे

अभ्यासातील एकाग्रता वाढण्यासाठी शरीरस्वास्थ्य महत्त्वाचे आहे. ते चांगले राखण्यासाठी हे करावे –

  • प्रत्येक दिवशी सकाळी सूर्यनमस्कार घालावेत.
  • सकस आणि संतुलित आहार घ्यावा. आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ नये, तसेच उपाशी पोटीही अभ्यास करू नये.
  • पुरेशी झोप घ्यावी

५. मन शुद्ध आणि निर्मळ ठेवावे

मन शुद्ध आणि निर्मळ असेल, तर एकाग्रता लगेच साधता येते. मनात वाईट विचार असतील, तर मनाची एकाग्रता साध्य करणे कठीण जाते. यासाठी आपल्याला शिकायला मिळेल अशीच चांगली पुस्तके वाचावीत, दूरचित्रवाणीवरील चांगले कार्यक्रमच पहावेत आणि चांगल्या विचारांच्या मुलांशीच मैत्री करावी.

६. स्वयंसूचना द्यावी

अभ्यास करतांना मन अभ्यासावरून इतरत्र गेल्यावर त्याची जाणीव होऊन पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येण्यासाठी मनाला स्वयंसूचना द्यावी.

स्वयंसूचनेचे एक उदाहरण –

‘अभ्यास करतांना जेव्हा क्रिकेट खेळण्याचे विचार माझ्या मनात येत असतील, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि ‘अभ्यास लक्षपूर्वक करण्यातच माझे हित आहे’, याची मला जाणीव होऊन मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करीन.’

अशी सूचना दिवसभरात मध्ये मध्ये द्यावी. ही सूचना रात्री झोपतांना ८-१० वेळा स्वतःच्या मनावर बिंबवल्यानेही लाभ होतो. सलग २-३ आठवडे असे केल्यास भरकटणारे मन पुनःपुन्हा अभ्यासाकडे वळवता येते, उदा. गाणे ऐकणे – गाणे म्हणणारा अभिनेता – चित्रपट अशा विचारमालिकेत मन गुंतू लागले की, आणखी पुढे पुढे भरकटत जाण्याआधीच अंतर्मन बाह्यमनाला त्याची जाणीव करून देते आणि पुन्हा अभ्यास करायला लावते.

७. नामजप आणि प्रार्थना

सर्वांनाच सर्व वेळी ध्यान लावणे शक्य होईल किंवा जमेल असे नाही. त्यामुळे एकाग्रता वाढवण्यासाठी नामजप आणि प्रार्थना यांचे साहाय्य होते.

अ. नामजप कोणता करावा ?

आपली कुलदेवी अथवा कुलदेव यांचा नामजप प्रतिदिन कमीतकमी २० मिनिटे करावा. तसेच पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ३० मिनिटे करावा.

आ. प्रार्थना कोणत्या कराव्यात ?

१.‘हे कुलदेवते, तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहू दे.’

२. ‘हे बुद्धीदाता श्री गणेशा, माझा अभ्यास चांगला होण्यासाठी मला शक्ती आणि सद्बुद्धी दे.’

८. मारुतिस्तोत्र, रामरक्षा आणि इतर स्तोत्रे प्रतिदिन म्हणावीत

स्तोत्रांमुळे मनावर सात्त्विकतेचा संस्कार होतो आणि मनाची एकाग्रता वाढते. स्तोत्र म्हणणाऱ्याच्या भोवती देवतेचे संरक्षक-कवच निर्माण होते. संस्कृत भाषेतील स्तोत्रांचे पाठांतर केल्याने उच्चारही सुधारतात.

९. ध्यान किंवा प्राणायाम करावा

प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी २-३ मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करावा. ध्यान किंवा प्राणायाम करण्याचा सराव केल्यामुळे मनाची एकाग्रता साधणे सुलभ होते. ध्यान किंवा प्राणायाम कसा करायचा, हे जाणकार व्यक्तीकडून नीट समजून घ्यावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘अभ्यास कसा करावा ?

Leave a Comment