दृढनिश्चयी विवेकानंद

जयपूरला असतांना स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी तेथील एका प्रसिद्ध संस्कृत पंडितांकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र नाना प्रकारे समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते. तीन दिवसांच्या सततच्या प्रयत्नांनंतर पंडितजी म्हणाले, “पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा मी आपल्याला एकही सूत्र समजावून देऊ शकलो नाही. त्यामुळे माझ्याजवळ शिकण्याने आपल्याला लाभ होईल, असे मला वाटत नाही.'' पंडितजींचे बोलणे ऐकून विवेकानंदांना फार वाईट वाटले. जोवर या सूत्राचा अर्थ समजणार नाही, तोवर जेवण-खाण सर्व बंद! असा ठाम निर्धार त्यांनी केला. त्यांनी एकाग्र चित्ताने त्या सूत्रातील भाष्य समजून घेतले. नंतर ते पंडितजींकडे गेले. त्यांच्याकडून सूत्रांचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींनाही आश्चर्य वाटले.

बालमित्रांनो, `केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. ठाम निर्धार केला की, कुठलीही गोष्ट असाध्य नसते.

Leave a Comment