नारळी पौर्णिमा

श्रावण मासातील हिंदूंच्या सणांचे महत्त्व !

‘विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आदर्श हिंदु संस्कृतीत आपण अनेक सण साजरे करतो. ‘हे सण काआणि कसे साजरे करावेत ? त्यामागील शास्त्र काय ?’, हे आपल्याला कुणी सांगत नाही. त्यामुळेआपल्या हिंदु सणांमध्ये अनेक विकृत आणि अयोग्य गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आपल्यालाआपल्याच सणांविषयी आदर आणि आपलेपणा वाटेनासा झाला आहे. मित्रांनो, हे योग्य आहे का ? आपलेसण म्हणजे सहज कुणालतरी वाटले किंवा कुणाच्या तरी मनात आले; म्हणून आपण साजरे करत नाही.समाजावर चांगले संस्कार व्हावेत आणि सर्वांची देवावरील श्रद्धा वाढावी’, यांसाठी आपल्या ऋषीमुनींनीया सणांची निर्मिती केली आहे.

मित्रांनो, आपण सर्व जण प्रत्येक सण भावपूर्ण साजरा करण्याचा निश्चय करूया. प्रत्येकाच्यामनात आपल्या (हिंदूंच्या) सणांविषयी आदर आणि भक्तीभाव निर्माण करूया. हिंदु धर्मातील प्रत्येकसणामागील उद्देश जाणून घेतला, तर आपण आदर्श आणि आनंदी जीवन जगू शकतो.

नारळी पौर्णिमा

१. प्रार्थनेतील शक्ती आणि श्रद्धा यांमुळे पाऊस पडणे : मित्रांनो, एक गोष्ट सांगतो. एका गावातएक वर्षी पाऊसच पडला नाही. तेव्हा गावातील लोकांनी ठरवले, ‘आपण गावातील मोकळ्या जागेतजाऊन वरुणदेवाला प्रार्थना करूया, म्हणजे पाऊस येईल.’ त्याप्रमाणे गावातील (श्रद्धाळू) लोक प्रार्थनाकरण्यासाठी गेले. एका मुलाने सोबत छत्री घेतली. इतरांनी त्याला विचारले, ‘‘तू छत्री का घेतली आहेस?’’ तो म्हणाला, ‘‘आपण प्रार्थना केल्यावर पाऊस पडेल. तेव्हा भिजायला होईल; म्हणून मी छत्री घेतली.’’‘प्रार्थनेने पाऊस येणारच’, अशी त्या मुलाची ठाम श्रद्धा होती. आश्चर्य म्हणजे, खरोखरच लोकांनी प्रार्थनाकेल्यानंतर लगेच पाऊस आला. मित्रांनो, प्रार्थनेत पुष्कळ शक्ती आहे.

२. ‘वरुणदेवता प्रसन्न असल्यावर पाऊस योग्य वेळी आणि पुरेसा पडतो’, अशी लोकांचीश्रद्धा असणे : मित्रांनो, हिंदु संस्कृतीत देवच सर्व करतो ही श्रद्धा आहे; म्हणून लोक प्रतिवर्षीनारळीपौर्णिमेला वरुणदेवाची श्रद्धेने पूजा करतात. या दिवशी आपण समुद्र हे वरुणदेवाचे प्रतीक मानूनत्याचे पूजन करतो. समुद्राचे पूजन करणे, म्हणजे वरुणदेवतेचे पूजन करणे. वरुणदेवता प्रसन्न असेल, तरपाऊस योग्य वेळी आणि पुरेसा पडतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.

३. नारळीपौर्णिमेच्या दिवशी ‘वरुणदेव आला आहे’, असा भाव ठेवून त्याची पूजा करूया ! :पूर्वीचे लोक पावसाला ‘वरुणदेव’ असे मानून त्याची पूजा करत असत. ‘वरुणदेव आला आहे’, या श्रद्धेनेनारळीपौर्णिमेच्या दिवशी त्याचे पूजन करून स्वागत करत आणि कृतज्ञता व्यक्त करत असत. मित्रांनो,खरंच आज आपण या भावाने पूजन करतो का ? ‘वरुणदेव आला आहे’, असे समजून त्याचे स्वागतकरतो का ? यासाठी या दिवशी तसा भाव ठेवूया आणि त्याची पूजा करून त्याला प्रार्थना करूया.

४. वरुणदेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे, हीच खरी नारळीपौर्णिमा ! : वरुणदेवामुळेआपल्याला पाणी मिळते. पाण्यामुळे वीज मिळते. जर पाऊसच पडला नाही, तर काय होईल ? धान्यपिकणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. आपल्याला अन्न मिळाले नाही, तर काय होईल ? आपणजीवन जगू शकतो का ? पाण्याविना आपण जगूच शकत नाही. मित्रांनो, एखाद्याने आपल्याला एखादीवस्तू दिली, तर आपण लगेच त्यांना ‘धन्यवाद’ देतो ना ! मग वरुणदेव आपल्याला पाणी देतो, यासाठीआपल्याला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटते का ? नाही ना ? म्हणूनच मित्रांनो, आपण या दिवशी त्याच्याचरणी कृतज्ञता व्यक्त करूया आणि प्रार्थना करूया. हीच आपल्यासाठी खरी नारळीपौर्णिमा आहे.

मित्रांनो, आपण असे करणार ना ?

५. नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने समुद्राकडून काय शिकायचे ? : समुद्र सर्व नद्यांचे पाणीआपल्यात सामावून घेतो. तो कुणातही भेदभाव करत नाही. मित्रांनो, आपणसुद्धा व्यापक असायला हवे.आपणही सर्वांवर सारखे प्रेम आणि सर्वांशी समान व्यवहार करायला हवा.

– श्री. राजेंद्र महादेव पावसकर (गुरुजी), पनवेल.

Leave a Comment