नागपंचमी

श्रावण मासातील हिंदूंच्या सणांचे महत्त्व !

‘विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आदर्श हिंदु संस्कृतीत आपण अनेक सण साजरे करतो. ‘हे सण काआणि कसे साजरे करावेत ? त्यामागील शास्त्र काय ?’, हे आपल्याला कुणी सांगत नाही. त्यामुळेआपल्या हिंदु सणांमध्ये अनेक विकृत आणि अयोग्य गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आपल्यालाआपल्याच सणांविषयी आदर आणि आपलेपणा वाटेनासा झाला आहे. मित्रांनो, हे योग्य आहे का ? आपलेसण म्हणजे सहज कुणालतरी वाटले किंवा कुणाच्या तरी मनात आले; म्हणून आपण साजरे करत नाही. समाजावर चांगले संस्कार व्हावेत आणि सर्वांची देवावरील श्रद्धा वाढावी’, यांसाठी आपल्या ऋषीमुनींनीया सणांची निर्मिती केली आहे.

मित्रांनो, आपण सर्व जण प्रत्येक सण भावपूर्ण साजरा करण्याचा निश्चय करूया. प्रत्येकाच्यामनात आपल्या (हिंदूंच्या) सणांविषयी आदर आणि भक्तीभाव निर्माण करूया. हिंदु धर्मातील प्रत्येकसणामागील उद्देश जाणून घेतला, तर आपण आदर्श आणि आनंदी जीवन जगू शकतो.

नागपंचमी

१. ‘प्राणीमात्रातही देव आहे’, हे जाणून सर्वांशी समानतेने वागण्याससंत ज्ञानेश्वरांनीशिकवणे : जेव्हा ज्ञानेश्वरमाऊलींना पैठणच्या लोकांनी विचारले, ‘‘आपण म्हणता की, प्रत्येकप्राणीमात्रात देव आहे. मग तो समोरून येणारा रेडा वेद म्हणेल का ?’’ यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले,‘‘का नाही ? जे ईश्वरी तत्त्व माझ्यात आहे, तेच या रेड्यात आहे.’’ त्यांनी रेड्याच्या मस्तकावर हातठेवला आणि आश्चर्य म्हणजे रेडा वेद म्हणू लागला. त्या वेळी ‘देव प्रत्येकात आहे’, याची सर्व लोकांनाजाणीव झाली. ज्ञानेश्वरमाऊलींनी यातून सर्वांना शिकवले, ‘कोणत्याही प्राणीमात्राला न्यून (कमी) लेखूनका. त्यांच्यातही देव आहे, या भावाने त्यांच्याशी व्यवहार करा.’

२. नागपंचमीची शिकवण : मित्रांनो, आपण नागपंचमीला नागाची पूजा करतो. यातून ‘महान हिंदुसंस्कृतीत नागातील ईश्वरी तत्त्वाची देवासमान पूजा करतात’, हे आपण शिकायचे आहे.

मित्रांनो, आजकाल आपण वाचतो की, ‘अनेक प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत. लोक प्राण्यांचीअवैध मार्गाने शिकार करत आहेत.’ यासाठी नागपंचमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठरवूया की, प्राण्यांचीशिकार न करता आपल्याला त्यांचे संवंर्धन करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

– श्री. राजेंद्र महादेव पावसकर (गुरुजी), पनवेल.