नक्षत्रे

एकूण २७ नक्षत्रांचे चक्र असते. प्रत्येक नक्षत्राचे नाडी, गण,योनी, तत्व, देवता आहेत.१) अश्विनी – आद्यनाडी, अश्वयोनी, देवगण, अश्विनीकुमार
२) भरणी – मध्यनाडी, गजयोनी, मनुष्यगण, यम
३) कृत्तिका – अंत्यनाडी, मेषयोनी, राक्षसगण, अग्नि
४) रोहिणी – अंत्यनाडी, सर्पयोनी, मनुष्यगण, ब्रह्मा
५) मृग – मध्यनाडी, सर्पयोनी, देवगण, चंद्र
६) आर्द्रा – आद्यनाडी, श्वानयोनी, मनुष्यगण, शंकर
७) पुनर्वसू – आद्यनाडी, मार्जारयोनी, देवगण, अदिती
८) पुष्य – मध्ययोनी, मेषयोनी, देवगण, बृहस्पती
९) आश्लेषा – अंत्यनाडी, मार्जारयोनी, राक्षसगण, सर्प
१०) मघा – अंत्यनाडी, उंदीरयोनी, राक्षसगण, प्तर
११) पूर्वा – मध्यनाडी, उंदीरयोनी, मनुष्ययोनी, भग
१२) उत्तरा – आद्यनाडी, गोयोनी, मनुष्यगण, अर्यमा
१३) हस्त – आद्यनाडी, महिषीयोनी, देवगण, सूर्य
१४) चित्रा – मध्यनाडी, व्याघ्रयोनी, राक्षसगण, त्वष्टा
१५) स्वाती – अंत्यनाडी, महिषीयोनी, देवगण, वायु
१६) विशाखा – अंत्यनाडी, व्याघ्रयोनी, राक्षसगण, इंद्राग्नि
१७) अनुराधा – मध्यनाडी, मृगयोनी, देवगण, मित्र
१८) ज्येष्ठा – आद्यनाडी, मृगयोनी, राक्षसगण, इंद्र
१९) मूळ – आद्यनाडी, श्वानयोनी, राक्षसगण, निर्‌ऋति
२०) पूर्वाषाढा – मध्यनाडी, वानरयोनी, मनुष्यगण, उदक
२१) उत्तराषाढा – अंत्यनाडी, मुंगुसयोनी, मनुष्यगण, विश्वेदेव
२२) श्रवण – अंत्यनाडी, वानरयोनी, देवगण, विष्णू
२३) धनिष्ठा – मध्यनाडी, सिंहयोनी, राक्षसगण, वसु
२४) शततारका – आद्यनाडी, अश्वयोनी, राक्षसगण, वरूण
२५) पूर्वाभाद्रपदा – आद्यनाडी, सिंहयोनी, मनुष्यगण, अजैकचरण
२६) उत्तराभाद्रपदा – मध्यनाडी, गोयोनी, मनुष्यगण, अहिर्बुध्न्य
२७) रेवती – अंत्यनाडी, गजयोनी, देवगण, पूषा

वेदकाली नक्षत्रे चोवीस होती. तेव्हा फाल्गुनी, आषाढा आणि भाद्रपदा हे प्रत्येकी चार तारकांचे एक-एक असे नक्षत्रसमुह मानले होते. पण नंतरच्या काळात प्रत्येकी दोन तारकांचे पूर्वा आणि उत्तरा असे विभाग पाडण्यात आले आणि नक्षत्रे सत्तावीस झाली. त्यानंतर अभिजित तार्‍याला एक नक्षत्र मानून एकूण नक्षत्र संख्या २८ झाली. शतपथ ब्राम्हणात ही २८ नक्षत्रे दिलेली आहेत. त्याला ‘सर्वतोभद्रचक्र’ असे म्हणत असत. परंतु नंतर केव्हातरी अभिजित नक्षत्र वगळण्यात आले कारण ते नक्षत्र सूर्य-चंद्राच्या मार्गापासून फार लांब उत्तरेकडे आहे.