धार येथील श्री सरस्वतीदेवीचे मंदिर (भोजशाळा) !

{IMG:952}

भोजशाळा (धार, मध्यप्रदेश) म्हणजे साक्षात् विद्येची देवता सरस्वतीचे प्रकटस्थळ आहे.भोजराजाने श्री सरस्वतीदेवीची उपासना, हिंदू जीवन दर्शन आणि संस्कृत प्रसार या हेतूने वर्ष १०३४ मध्ये धार येथे भोजशाळेची निर्मिती केली. भोजशाळा हेअनेकविध विद्यांचे माहेरघर असलेले भारतातील एकेकाळचे विश्‍वविद्यालय आहे.महापराक्रमी राजा भोज याची ही तपोभूमी ! दरवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी येथे सरस्वतीदेवीची पूजा केली जाते.