Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

        भारतीय रसायनशास्त्राचे जनक. ७ व्या शतकाच्या प्रारंभातील शास्त्रज्ञ. सिद्ध नागार्जुन यांचे रसायनशास्त्रातील कार्य अविस्मरणीय आहे. विशेषत: सुवर्णाचा (सोने) पाठपुरावा आणि पार्‍यावरील त्यांचे संशोधन अतुलनीय होते. त्यांनी पार्‍यावर सांगोपांग अभ्यास करून सतत १२ वर्षे त्यावर संशोधन केले. पाश्चात्त्य देशांत पुढे जे जे प्रयोग झाले त्याचा पाया नागार्जुन यांनीच घातला.