विमान उड्डाण प्रयोगामागील खरा इतिहास !

१८९५ मध्ये आचार्य बापूजी तळपदे यांनी मरुत्सखा विमानाची
रचना करून स्वतः उड्डाण करणे अन्राईट बंधूंनी त्यांचे संशोधन बळकावणे !

पहिला विमान उड्डाण प्रयोग राईट बंधूंनी इ.स. १९०३-१९०४ साली केला. राईट बंधूंकडे विमान उड्डाण संशोधनाचे श्रेय जाते. हे साफ खोटे आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध १९०३ साली लावण्याच्या आठ वर्षे आधीच गिरगाव चौपाटीवर शिवकर तळपदे या मराठी माणसाने विमानाचे पहिले उड्डाण केले होते; परंतु तळपदे यांच्या वारसदारांनी विमानाचे मॉडेल राईट ब्रदर्स यांना विकून टाकल्याने विमानाच्या शोधाच्या श्रेयाला हिंदुस्थानला मुकावे लागले. हा अज्ञात इतिहास जगदीश गांधी या लेखकाने उलगडला आहे. त्यांच्या अ टेल ऑफ थ्री नेटिव्ह टाऊन्स : भुलेश्‍वर, गिरगाव अ‍ॅण्ड मलबार हिल या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन १७.६.२०११ या दिवशी नेव्हीनगरमधील मुल्ला ऑडिटोरियम येथे झाले.

महर्षी भारद्वाज यांनी वर्णन केलेल्या वैदिक शास्त्रानुसार मरुत्सखा हे पहिले वहिले विमान १८९५ साली मुंबई स्कूल ऑफ आटर्स येथे प्राध्यापक असलेल्या शिवकर तळपदे यांनी बनवले. हिंदुस्थानात मुंबईला चौपाटीवर बडोदा नरेश आणि सर्व प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत जाहीर रीतीने इ.स. १८९५ मध्ये संस्कृतचे आचार्य बापूजी तळपदे यांनी विमाण उड्डाण केले. वेद उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ यांच्या आधारे त्यांनी विमानाची रचना केली. त्यानी स्वतः इ.स. १८९५ साली वैमानिक बनून यशस्वी उड्डाण केले. ते स्वतः महान वैदिक शास्त्री होतेच; पण त्यांच्या पत्नीही संस्कृत पंडिता होत्या. या दोघांनी मिळून विमानाचे एक मॉडेल बनवले. ते चालकविरहित विमान होते; पण ते प्राचीन ग्रंथात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी बनवले होते. या विमानाचे उड्डाण मुंबई चौपाटीवर बडोद्याचे तत्कालीन नरेश सयाजीराव गायकवाड आणि मुंबईचे प्रथम नागरिक असलेले लालजी नारायण यांच्यासमोर त्यांनी केले. या विमानात एक असे यंत्र बसवण्यात आले होते, ज्यामुळे हे विमान १ सहस्र ५०० फूट उंचीवर गेले आणि तेथून खाली आले. विमान उड्डाणाच्या आधी त्यांनी जे संशोधन केले, त्यावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली. त्यांचे संदर्भ आजही वेदविद्या प्रचारिणी सभा, पुणे आणि जुन्या ग्रंथातून उपलब्ध आहेत. वायू, सूर्य आणि अग्नी आणि आकर्षण अन् विकर्षण यांचे विवेचन यजुर्वेदात आहे.

तळपदे यांनी त्यांची कलाकृती महादेव गोविंद रानडे यांनाही दाखवली होती; पण याच दिवसांत तळपदे यांच्या पत्नीचे निधन झाले आणि विमानाच्या पुढील आविष्काराकडे तळपदे यांचे दुर्लक्ष झाले. पुढे १७.९.१९१७ ला शिवकर तळपदे यांचेही देहावसान झाले. इ.स. १८९५ साली उडालेले मरुत्सखा हे विमान त्याचे आराखडे, विमान रचनेची टिपणे, सांगाडा, आणखी बर्‍याच टिपण वह्या त्यांच्या वंशजांकडे होत्या. त्या पाश्‍चात्त्यांनी बळकावल्या. त्यानंतर त्यांच्या वारसदारांनी विमानाचे मॉडेल राईट ब्रदर्स या ब्रिटीश कंपनीला विकून टाकले. त्यावरून राईट बंधूंनी विमान उड्डाण केले. पहिल्या विमानाची निर्मिती करण्याचा मान मराठी माणसाचा असूनही तो राईट ब्रदर्स या ब्रिटिशांना दिला जाणे, ही निश्‍चितच खेदाची बाब असल्याचे गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.

– (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका घनगर्जित, मार्च २००५, वर्ष तिसरे, अंक १२. आणि दैनिक सनातन प्रभात, ज्येष्ठ शु. द्वादशी/त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११३ (१३.६.२०११))