नौकानयनशास्त्र

भारतात विकसित झालेले नौकानयनशास्त्र इंग्रजांनी नामशेष केले !

गोधा नामक १५०० टनी जहाजे हिंदुस्थानात १७ व्या शतकापर्यंत बांधली जात. ईस्ट इंडिया कंपनीत एक भारतीय बनावटीचे दर्या दौलत नामक जहाज होते. ते ८७ वर्षांत कधी दुरुस्तही करावे लागले नाही. भारताचे हे ज्ञान पाहून इंग्रजांनी हिंदुस्थानातील नौकानिर्मितीवर बंधने घातली आणि ती विद्या नामशेष केली.

नौकानयनशास्त्रातील सर्व नामे आणि क्रियापदे भारतीय भाषांमध्ये एके काळी होती; हे एकच शास्त्र नव्हे, तर सगळी शास्त्रे भारतात प्रगत होती आणि त्यांचेच शब्द वापरात होते. आज मात्र विज्ञानाच्या कुठल्याही शाखेत भारतीय शब्द उरलेला नाही. सुतारकामातील प्रत्येक वस्तूला आणि क्रियेला मुळात मराठी शब्दच होते; नौकानयन या क्षेत्राचा विचार करतांना या भारतभूचा व्यापार जावा-सुमात्रा म्हणजे सध्याचे इंडोनेशिया इथल्या देशांपर्यंत समुद्रमार्गाने होत असे. आता एवढ्या लांबवर समुद्रमार्गाने जायचे तर दिशा, काल, नौकानयन यांबाबत किती प्रगती करायला हवी, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

मुलांनो, आपल्या प्राचीन हिंदुसंस्कृतीचा अभिमान बाळगा !

– डॉ. दुर्गेश सामंत (त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे २६.४.२००७ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती मंचची स्थापना करण्यात आली. त्या वेळी केलेले भाषण)

Leave a Comment