अतीविशाल कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !

कालाची महानताही आपल्या पूर्वजांनी ओळखलेली होती. वेदांनंतरच्या ग्रंथांमध्ये तिचे वर्णन येते. ते वैदिक ज्ञानच आहे. दिन आणि रात्र यांच्यापासून भगवंताने मोजणी आरंभली आहे.

१. कलीयुग : १००० वर्षे

२. द्वापर : २००० वर्षे

३. त्रेता : ३००० वर्षे

४. सत्ययुग : ४००० वर्षे

दिव्य वर्षे : युगातील वर्षे ही दिव्य वर्षे मानायची म्हणजे त्यास ३६० ने गुणायचे.

चतुर्युगी : चार युगे एकत्र म्हणजे चतुर्युगी.

ब्रह्मदेवाचा एक दिन, रात्र आणि आयुष्य : एक सहस्र चतुर्युगी म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिन आणि तेवढीच त्याची एक रात्र असते. अशी शंभर वर्षे ब्रह्मदेवाचे आयुष्य असते.

कल्प : एक सहस्र चतुर्युगे म्हणजे एक कल्प

संदर्भ : वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. ५७, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक