आर्यभट्ट


पाचव्या शतकात सूर्य-चंद्र यांचे वेध घेणारे एक महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ. काळ इ.स. ४७६. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमणगती आणि परिभ्रमणगती यासंबंधी स्पष्ट कल्पना आर्यभट्ट यांनी त्या काळात मांडली. त्यांच्या या संशोधनामुळे भारताच्या पहिल्या उपग्रहास त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी ‘आर्यभटिका’ हा ग्रंथ लिहून सार्‍या जगात भारताचे नाव उज्ज्वल केले.

गॅलिलीओच्या १ हजार वर्षे आधीआर्यभट्टांनी
पृथ्वी गोल असल्याचे सांगणे व तिचा व्यासही सांगणे

आर्यभट्टांनी (इ.स. ५ वे शतक) आपल्या ‘आर्यभट्टीयम्’ नामक ग्रंथामध्ये प्रथम पृथ्वी गोल असल्याचा उल्लेखकरून पृथ्वीचा व्यासही अचूक सांगितला.

मृज्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः । – आर्यभट्टीयम्, ४-६

अर्थ : माती, पाणी, अग्नी व वायू यांनी युक्त अशी पृथ्वी गोल आहे.

याच ग्रंथामध्ये ‘नृषियोजनं, ञिला भूव्यासो ……..’ असे सूत्र आले आहे. याचा अर्थ ‘नर x षि · योजना व ‘ञिला’ योजनेएवढा पृथ्वीचा व्यास आहे’, असा होतो. यामधून पृथ्वीच्या व्यासाचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला ‘आर्यभट्टीय अंक पद्धतीची’ आवश्यकता आहे. याच ग्रंथामध्ये ती दिली आहे.

‘आर्यभट्टीय अंक पद्धती’ म्हणजे संक्षेपाने व सूत्ररूपाने ग्रंथ लिहिण्यासाठी तयार केलेली एक सांकेतिक भाषा.यामध्ये ‘क’ ते ‘म’ मुळाक्षरांना १ ते २५ असे आकडे दिले आहेत. म्हणजे क · १, ख · २, ग · ३ …. भ ·२४, म · २५, य · ३०, र · ४०, ल · ५० … ह · १००. स्वरांमध्ये ‘इ’कार म्हणजे ‘गुणिले १००’, ‘उ’ कार म्हणजे ‘गुणिले १०,०००’ व ‘ऋ’कार म्हणजे ‘गुणिले १०,००,००० (दहा लाख).’ अशा पद्धतीने अत्यंत सोपी अशी ही आर्यभट्टीय अंक पद्धती आपल्याला समजली की, ‘ञिला भूव्यासो’ या सूत्राचा अर्थ समजेल.
= १०, इ = x १००, ञि (ञ + इ) = १० x १०० = १०००
= ५० म्हणून ञिला = १००० + ५० = १०५०
म्हणजे पृथ्वीचा व्यास १०५० योजने एवढा आहे.

‘नृषि योजना’ या सूत्रावरून १ योजन = किती किलोमीटर हे काढता येते.नृ x षि म्हणजे १ योजन. नृ म्हणजे माणसाची सरासरी उंची. (याचे प्रमाणही प्रस्तुत ग्रंथात दिलेले असून विस्तारभयास्तव येथे मांडलेले नाही.) षि =+= ८० x १०० = ८०००० म्हणजे १ योजन. माणसाची सरासरी उंची x ८०००० हे सर्व गणित करून त्या वेळी १ योजन म्हणजे १२.११ कि.मी. होते व ही संख्या जेव्हा ‘ञिला भूव्यासः’ या सूत्रामध्ये घालतो, तेव्हा आपल्याला पृथ्वीचा व्यास १२,७१६ कि.मी. एवढा मिळतो. आता उपग्रहांच्या सहाय्याने मोजलेला पृथ्वीचा व्यास १२७५६ कि.मी. आहे.’

आर्यभट्टांनी एका सूत्रावरून पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे, हे सांगणे

‘याच आर्यभट्टांनी ‘भ’ अपक्रमो ग्रहांशः ।’ या सूत्रावरून ‘पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे’, हे सांगितले आहे. भ = २४ म्हणजेच पृथ्वी २४ अंशांनी कललेली आहे. आताच्या विज्ञानाने तीच संख्या (value) २३.५ अंश अशी सांगितली आहे.’

Leave a Comment