औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

इ.स. पूर्व १०० ते २०० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील अयुर्वेदतज्ज्ञ म्हणजे चरकाचार्य. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेदशास्त्रावरील ग्रंथाचा निर्माणकर्ता. चरकाला ‘काया चिकीत्सक’ असेही म्हणतात. चरकाचार्य आणि सुश्रुताचार्य यांनी इ.स. पूर्व ५००० मध्ये लिहिलेल्या अथर्ववेदातून ज्ञान प्राप्त करून ३ खंडांत आयुर्वेदावर प्रबंध लिहिले.

आधुनिक विज्ञानयुगातील शरीरशास्त्राविषयी युरोपमधील वेगवेगळ्या सिद्धांतांमुळे आजही गोंधळाची स्थिती आहे. मात्र खिस्तपूर्व ६०० वर्षे आचार्य चरक यांनी शरीरशास्त्र, गर्भशास्त्र,रक्ताभिसरणशास्त्र, औषधशास्त्र इत्यादींविषयी अगाध संशोधन केले होते. मधुमेह, क्षयरोग, हृदयविकार आदी दुर्धर रोगांचे निदान अन् औषधोपचार यांविषयीच्याही अमूल्य ज्ञानाची कवाडे त्यांनी अखिल जगतासाठी खुली केली.

Leave a Comment