बौद्धयन

        २५०० वर्षांपूर्वी (खिस्तपूर्व ५००) ‘पायथागोरस सिद्धांत’चा वेध घेणारा भारतीय भूमितीतज्ज्ञ. सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारतीय भूमितीतज्ज्ञांनी भूमितीशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केले. निरनिराळ्या तर्‍हेच्या आणि आकारांच्या ‘यज्ञवेदी’ बांधण्याची भौमितीय रचनापद्धती ही बौद्धयन यांनी शोधून काढली.  दोन काटकोन समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतके क्षेत्रफळ असणारा ‘काटकोन’ समभुज चौकोन काढणे, चौकोनाचे त्याच्याइतेकच क्षेत्रफळ असलेला समभुज चौकोन काढणे आणि त्या आकृतीचे तिच्या इतक्याच क्षेत्रफळाच्या वर्तुळात परिवर्तन करणे यांसारखे अनेक संदिग्ध प्रश्न बौद्धयन यांनी सहज सोडवले.

Leave a Comment