परमाणूशास्त्राचे जनक आचार्य कणाद !

इ.स. पूर्व ६०० वर्षे या कालखंडातील भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेतील अणुसिद्धांताची महती जगाला पटवणारे एक तोर तत्त्वज्ञानी म्हणजे कणाद. यांचे मूळ नाव ‘औलुक्य आणि कश्यप’ असे होते. त्या काळात भगवान शंकराचा अवतार म्हणून मानलेले विद्वान ‘सोमशर्मा’ यांचे कणाद हे शिष्य होते.

अणूशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांच्यापूर्वी २५०० वर्षे आचार्य कणाद यांनी ‘द्रव्याचे परमाणू असतात’, हे सांगितले. ‘अणूशास्त्रात आचार्य कणाद आणि इतर भारतीय शास्त्रज्ञ हे युरोपीय शास्त्रज्ञांच्या तुलनेत जगद्विख्यात होते’, असे प्रसिद्ध इतिहासकार टी.एन्. कोलेब्रुक यांनी म्हटले आहे. अणू-परमाणू कल्पनेचा आद्य संशोधक म्हणून कणादांच्या विचारांना जागतिक मान्यताही मिळाली आहे. वैशेषिक तत्त्वज्ञानाविषयीच्या ‘वैशेषिक सूत्र’ या ग्रंथाचा रचनाकार म्हणूनही कणाद प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment