आहाराचे काही नियम

१. भोजनाच्या वेळी सभोवतालचेवातावरण

अ. आल्हाददायक असावे.

आ. जेवतांना वादविवाद, भांडण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

२. भोजनाला प्रारंभ करतांना: आपल्या आराध्य दैवताला नमस्कार करून तिला सर्व अन्न अर्पण करावे आणि मग तिचा प्रसाद म्हणून सर्व अन्न भक्षण करावे.

३. भोजन कधी करावे ?: पिंगला नाडी चालू असतांना भोजन केल्यास अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते.

३ अ. जेवल्यानंतर वामकुक्षी करणे: पिंगला नाडी चालू नसल्यास जेवतांना डाव्या पायाचा गुडघा किंवा फडक्याचा बोळा डाव्या काखेत दाबून धरला की, उजवी नाडी 'पिंगला' चालू होते. जेवल्यानंतर वामकुक्षी करण्यामागचा, म्हणजे डाव्या कुशीवर झोपण्यामागचा उद्देश पिंगला नाडी चालू करणे, हाच आहे.

४. किती वेळा आणि किती वेळाने जेवावे ?: दिवसभराचे अन्न एकाच वेळी खाण्यापेक्षा २-३ वेळा थोडे थोडे खावे. एकदा जेवल्यावर तीन घंट्यांच्या आत शक्यतो खाणे टाळावे.

Leave a Comment