रात्री दूध पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे

रात्री झोपतांना दूध प्यायल्याने पचनशक्ती मंदावते आणि कफाचे विकार होतात. त्यामुळे शक्यतो रात्री झोपतांना दूध न पिता सकाळी उठल्यावर स्नानानंतर दूध प्यावे. दूध प्यायल्यानंतर किंवा दुधासह काही खाऊ नये; कारण अन्य पदार्थांमध्ये मिठाचा अंश असतो ज्याचा दुधाशी झालेला संयोग शरिराला अपायकारक असतो. दूध प्यायल्यावर काही खायचे असल्यास ते साधारण एका घंट्याने खावे. रात्री दूध प्यायचेच झाल्यास त्यात १ कप दुधाला अर्धा चमचा या प्रमाणात हळद घालून ते प्यावे.

दूध पितांना ते उष्णच प्यावे. एका वेळी १ कप एवढेच दूध प्यावे. अधिक दूध प्यायल्यास ते पचतेच असे नाही. पुष्कळ लाेक आम्लपित्ताचा त्रास होतो म्हणून थंड दूध पितात. आम्लपित्तामध्ये थंड दूध प्यायल्याने तात्पुरता लाभ झाला, तरी थंड दूध पचनशक्ती बिघडवून टाकते. त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते आणि अजीर्ण झाल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास आणखी वाढतो. त्यामुळे कधीही थंड दूध पिऊ नये.

– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०१३)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment