परमपवित्र रसायन : पंचगव्य !

१. पंचगव्य परम पवित्र असे रसायन असणे

गव्यं पवित्रं च रसायनं च पथ्यं च हृद्यं बलबुद्धिकृत् स्यात् ।
आयुःप्रदं रक्तविकारहारी त्रिदोषहृद्रोगविषापहं स्यात् ॥

अर्थ :पंचगव्य (गायीचे तूप, दही, शेणाचा रस, दूध आदींपासून बनवलेले औषधी द्रव्य) परम पवित्र असे रसायन आहे. ते पथ्यकर आहे, हृदयाला आनंद देणारे, तसेच आयुष्य, बळ आणि बुद्धी देणारे आहे. ते त्रिदोषांचे शमन करणारे आहे, तसेच रक्तातील सर्व विकारांना दूर करणारे आहे. ते हृदयाचे आजार आणि विषाचा प्रभाव नष्ट करणारे आहे. हे ग्रहण केल्याने कायिक, वाचिक आणि मानसिक त्रास दूर होतात.

२. पंचगव्याच्या प्राशनाने महापातकांचा नाश होणे

प्राशनं पञ्चगव्यस्य महापातकनाशनम् ।

अर्थ :पंचगव्याच्या प्राशनाने महापातकांचा नाश होतो.

सर्व प्रकारचे प्रायश्‍चित्त, धार्मिक कृत्ये आणि यज्ञ या वेळी पंचगव्य प्राशन करण्यास सांगितले आहे. वेद, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांमध्ये ते बनवण्याची पद्धत अन् ग्रहणविधी यांचे वर्णन आहे. ते शास्त्रोक्त पद्धतीने पावित्र्यपूर्वक मंत्रोच्चारासहित बनवले जाते.

Leave a Comment