उपयुक्त भारतीय गायी आणि
अपायकारक विदेशी गायी !


भारतीय गाय

१. भारतीय गायींची वैशिष्ट्ये

अ. भारतीय जातीच्या गायी स्थानिक वातावरणाशी एकरूप झाल्या आहेत. त्या उन्हाळा सोसण्यास सक्षम आहेत.

आ. त्यांना अल्प पाणी लागते.इ. त्या लांबचा प्रवास करू शकतात.

ई. भारतातील गायी भारताच्या त्या त्या भागातील निसर्गनिर्मित गवतावर जगू शकतात.

उ. त्यांच्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते.

ऊ. या गायींचे योग्य पद्धतीने पालनपोषण झाले आणि त्यांना सकस आहार मिळाला, तर या उच्च दुग्ध उत्पादक बनू शकतील.


विदेशी गाय

२. विदेशातील गायींच्या प्रजातींपेक्षा अधिक दूध देणारी
भारतीय प्रजातीच्या गायी !

२ अ. ब्राझीलमध्ये दुग्ध उत्पादनाची स्पर्धा झाली. त्या वेळी भारतीय प्रजातीच्या ‘गिर’ गायीने एका दिवसात ४८ लिटर दूध दिले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत भारतीय प्रजातीच्या ‘गिर’ गायीलाच द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. या गायीने एका दिवसात ४५ लिटर दूध दिले. या स्पर्धेत तृतीय क्रमांकही आंध्रप्रदेशच्या ‘ओंगोल’ प्रजातीच्या गायीला (या गायीला ब्राझीलमध्ये ‘नेरोल’ असे म्हणतात) मिळाला. तिनेही एका दिवसात ४५ लिटर दूध दिले.

२ आ. भारतीय प्रजातींच्या तीन महत्त्वाच्या गायी ‘गिर, काँकरेज अणि ओंगोल’ या जर्सी गायीपेक्षा अधिक दूध देतात.

३. भारतीय गायी विदेशी गायींपेक्षा अधिक दूध
देत असूनही भारताने विदेशी गायी आयात करणे

भारतीय प्रजातीची एक गाय तर विदेशी प्रजातीची ‘हॉलेस्टोन फ्राईजियन’ नावाच्या गायीपेक्षा अधिक दूध देते. असे असतांना भारतात दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘हॉलेस्टोन फ्राईजियन’ या विदेशी गायींची आयात होते.

४. भारतीय प्रजातीच्या गायींच्या दूधाची उपयुक्तता आणि
पाश्चिमात्य गायींच्या दुधाची अपायकारकता

४ अ. आपल्या गायींच्या दुधात कर्करोगासारख्या रोगांवर उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण घटक ‘ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड’ असतो. विपर्यास म्हणजे या रोगावर औषध म्हणून ‘ओमेगा-६’च्या निर्मितीसाठी एक मोठा उद्योग विकसित झाला आहे. ते ‘कॅप्सूल’च्या स्वरूपात विकले जाते; परंतु आपल्या भारतीय गायींच्या दुधात निसर्गतः उपलब्ध असलेल्या या घटकाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. आयात केलेल्या गायींमध्ये ‘ओमेगा-६’ चे अस्तित्व काडीमात्रही आढळत नाही.

४ आ. न्यूझीलंड येथील शास्त्रज्ञांच्या संशोधनाप्रमाणे ‘पाश्चिमात्य गायींच्या दुधात ‘बीटा केसो मर्फिन’ नावाचे रासायनिक द्रव्य असते. या द्रव्यामुळे स्मृतीभ्रंश (अल्झायमर) आणि पार्किन्सन यांसारखे गंभीर रोग होतात.

५. भारतीय गायीचे शेण ‘पंचगव्य’ बनवण्यासाठी
अनुकूल असून रासायनिक औषधांना उत्तमपर्याय असणे

भारतीय प्रजातीच्या गायींचे शेणही पाश्चिमात्य देशातून आयात केलेल्या गायींच्या तुलनेत श्रेष्ठ असते. भारतीय गायींचे शेण अर्धघट्ट असते, तर आयात केलेल्या गायींचे शेण अर्र्धतरल असते. या व्यतिरिक्त देशी गायींचे शेण ‘पंचगव्य’ बनवण्यासाठी अनुकूल असून रासायनिक औषधांना उत्तम पर्याय आहे.

६. भारतीय गायींचे मूत्र एक उत्तम औषधी !

अनेक संशोधनांतून असे सिद्ध झाले आहे की, गो-मूत्र एक उत्तम औषधी आहे. अमेरिकेमध्ये गोमूत्र आणि एक प्रतिजैविक औषध यांचे ‘पेटंट’ (मिश्रणाचे संशोधनाचे सनद) मिळवले असून गोमूत्रामधे कार्यरत असणार्‍या कर्करोग प्रतिबंधक गुणांमुळे हे ‘पेटंट’ घेण्यात आले आहे.’

संदर्भ : पाक्षिक ‘पावन परिवार’, १ ते १५ एप्रिल २०११

Leave a Comment