गोमूत्राचे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्व !

नवीन संशोधनानुसार गोमूत्रात नायट्रोजन, सल्फर, लोह,
कॅल्शियम, जीवनसत्वे आदी विविध घटक असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे गोमूत्राचे लाभ पुढील प्रकारे होऊ शकतो, असे लक्षात आले आहे.

१. गोमूत्र रक्तातील अनियमितता दूर करते, रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी साहाय्य करते आणि रक्तशुद्धीसाठी परिणामकारक ठरते.

२. गोमूत्र मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत चालू ठेवते. मूतखडे सिद्ध होण्यास प्रतिबंधकारक ठरते.

३. शरिराच्या एकसमान श्वसनास आणि शक्तीस साहाय्य करते.

४. शरिरातील जंतूंच्या वाढीस प्रबंध करते. गँग्रीनसारख्या रोगाच्या जंतूंनाही ते परिणामकारकपणे विरोध करते.

५. हृदयाची कार्यक्षमता वाढवून निराशा घालवण्यास आणि समाधान मिळण्यास कारणीभूत ठरते.

संदर्भ: दैनिक सनातन प्रभात