पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले संतपदी विराजमान



पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका)
संतपदी विराजमान झाल्याविषयी त्यांच्या चरणी बालसंस्कार
संकेतस्थळाशी निगडित सर्व साधकांकडून कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार !

१. पू. अप्पाकाकांच्या लिखाणाला संकेतस्थळाच्या वाचकांकडून
मिळत असलेला प्रतिसाद त्यांच्या बहुआयामी आणि अष्टपैलू लिखाणाची पावतीच !

बालसंस्कार संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलांविषयीच्या विविध विषयांवरील लेखांद्वारे मुलांवर सुसंस्कार करणारे पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) (वय ८० वर्षे) हे मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११४ (१६.१२.२०१२) या दिवशी संतपदी विराजमान झाले. पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले हे जगविख्यात बालरोगतज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या बहुआयामी आणि अष्टपैलू अशा अनमोल लिखाणाच्या माध्यमातून मुलांसह त्यांच्या पालकांसाठीही बोधप्रद गोष्टी, तसेच अन्य विषय यांवरील लेखांचे लिखाण केले. त्यांनी आतापर्यंत आयुर्वेद आणि पालकांसाठी मार्गदर्शन या विषयांवर २४ ग्रंथ लिहिले आहेत. रसाळ अन् ओघवती भाषाशैली ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये ! वाचकांना सहज आकलन होतील, अशा त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे अवघड विषयांवरील त्यांचे लेखही वाचक सहज आत्मसात करू शकतात. तेव्हाच आम्ही हे सर्व लेख बालसंस्कार संकेतस्थळावर प्रसिद्ध करू शकलो. त्यांच्या लेखांचा वाचकांना लाभ होत असून वाचकांकडून उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

पू. अप्पाकाकांनी आयुर्वेद, बालरोग यांसारख्या विषयांसह आध्यात्मिक स्वरूपाच्या विषयांवरही विपुल लेखन केले आहे. व्यावसायिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांची योग्य प्रकारे सांगड घालून आध्यात्मिक प्रगती कशी करायची, याचा फार मोठा आदर्शच पू. अप्पाकाकांनी आम्हा सर्वांसमोर ठेवला आहे.

२. पू. अप्पाकाकांचे व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन

व्यवहारात यशस्वी झालेल्या व्यक्तीने अध्यात्मातही भरारी घेतल्याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले ! वाचकांसाठी त्यांच्या व्यावसायिक जीवनातील उत्तुंग यशाविषयी येथे माहिती देत आहोत.

२ अ. व्यावसायिक जीवन

१. खिस्ताब्द १९६० ते १९९० : प्राध्यापक आणि बालरोगशास्त्र विभागाचे प्रमुख (हेड ऑफ पेडियाट्रीक डिपार्टमेंट)

२. लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज येथे नवजातशिशूशास्त्र (नेओनेटॉलॉजी) आणि रक्तविकारशास्त्र (हिमॅटॉलॉजी) या अतिविशेष विभागांची स्थापना करणे

२ आ. शास्त्रीय लिखाण

१. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी १५० वैज्ञानिक / शास्त्रीय लेख

२. इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये पालकांसाठी ६ ग्रंथ

३. इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये आयुर्वेदावर १८ ग्रंथ

४. संपादक : खिस्ताब्द १९६५ ते १९९५ – ‘पेडियाट्रिक क्लिनिक्स ऑफ इंडिया’चे संपादक

२ इ. आंतरराष्ट्रीय मान्यता

१. खिस्ताब्द १९६५ : टोकियो, जपान येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल पेडियाट्रीक कॉन्फरन्स’मध्ये भारतातून आलेला ‘उत्कृष्ट लेख’ यासाठी ‘युनिसेफ फेलोशिप’

२. खिस्ताब्द १९६८ : मेक्सिको येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल पेडियाट्रीक कॉन्फरन्स’च्या ‘इन्फेक्शन्स इन न्यूबॉर्न’साठी तज्ञगट म्हणून आमंत्रित

३. खिस्ताब्द १९८० : बँकॉक येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आल्टरनेटिव्ह मेडिसिन’चे अध्यक्ष

४. फेब्रुवारी २००१ : पुणे येथे झालेल्या ‘आयुर्वेद अ‍ॅण्ड हिपॅटिक डिसऑर्डर्स’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये ‘लाइफ टाइम अचीव्हमेंट’ (जीवनगौरव) पुरस्कार

५. ख्रिस्ताब्द २०१० : ‘योगविद्या निकेतन’द्वारा ‘योग मित्र’ पुरस्कार

६. खिस्ताब्द २०१२ : ‘इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ पेडियाट्रीक्स’द्वारा ‘लाइफ टाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार

व्यवहार आणि अध्यात्म यांमध्ये प्रगती केलेले ऋषीतुल्य पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) यांचे असेच अमूल्य मार्गदर्शन अन् आशीर्वाद आम्हाला सदैव लाभोत, ही त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना !’

– बालसंस्कार.कॉम