दिवाळीत करावयाच्या सात्त्विक आणि धर्माभिमान जागृत करणार्‍या कृती

१. सात्त्विक रांगोळ्या काढाआणि ‘कार्टून’ वा देवतांच्या चित्रांच्या
विडंबनात्मक रांगोळ्यांच्या माध्यमातून होणारी धर्महानी रोखा

या दिवसांत प्रत्येकघरासमोर रांगोळी काढतात. पुष्कळ लोकांना रांगोळीमागील शास्त्र ठाऊक नसल्याने ते‘कार्टून’च्या वा देवतांच्या चित्रांच्या विडंबनात्मक रांगोळ्या काढतात. हे पापच आहे. आपण असे करणे थांबवून हिंदु धर्माचे रक्षण करायला हवे.

२. फटाके वाजवून ध्वनी आणि वायू यांचे होणारे प्रदूषण टाळा

मित्रांनो, दिवाळी हा सण मौजमजा करण्यासाठी नसून आपला धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी अन् इतरांना आनंद देण्यासाठी आहे. फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजाने आपण इतरांना दुःख देतो कि आनंद देतो ? पुष्कळ लोक या दिवसांत फटाक्यांना कंटाळून शहर सोडून दुसरीकडे रहायला जातात. आपल्याला शाळेत ‘पर्यावरणाचे संरक्षण करा’, असे शिकवले जाते. या दिवाळीत आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निश्चय करायचा आहे.

३. फटाक्यांचे दुष्परिणाम

३अ. शारीरिक आणि मानसिक त्रास : फटाक्यांच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो. फटाक्यांच्या धुरामुळे वयोवृद्धांना श्वसनाचे त्रास होतात. लहान मुलांना या आवाजामुळे मानसिक धक्का बसतो.

आ. आग लागण्याची भीती : बाणांसारख्या फटाक्यांमुळे गवताची झोपडी, तसेच गवताची गंजीयांना आग लागून हानी होते.

इ. पैशाची उधळपट्टी : आज देशात प्रचंड गरिबी आहे, अनेकांना खायला अन्नही मिळत नाही आणि आपण फटाक्यांवर भरमसाठ पैसे घालवतो. आपण या देशाचे नागरिक आहोत. अशा गोष्टींवर होत असलेला पैसा वाचवून देशाची हानी टाळायला हवी.

ई. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके लावू नका : पुष्कळ मुले देवतांची चित्रेअसलेले फटाके वाजवतात. यामुळे त्या देवतेच्या चित्राचे तुकडे होतात. हे तर मोठे पाप आहे. आपल्यालाआई-वडिलांच्या छायाचित्रांचे तुकडे झालेले आवडेल का ? आपल्याला याची चीड यायला हवी.

देवतांचे गुणगान असणारी भजने, तसेच देवाची आरती यांमुळे देवता आकर्षित होतात.फटाक्यांच्या आवाजाने लोकांनाच एवढा त्रास होतो, तर मग अशा ठिकाणी देवतांना यावेसे वाटेल का ? अशाने आपल्यावर देवतांची कृपा होणारका ? नाही ना ? मित्रांनो, या दिवाळीला आपण फटाक्यांची ही कुप्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्नरत व्हा !

४. ज्याप्रमाणे दिवा अंधाराचा नाश करतो,त्याप्रमाणे दोष आणि अहं
यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न वाढवून आंतरिक दिवाळी साजरी करा !

दिवा अंधाराचा नाश करतो. मित्रांनो, आपल्या जीवनात कोणता अंधार आहे ? दोष आणि अहं यांमुळे आपण दुःखी आहोत. दिवा हे आनंदाचे प्रतीकआहे. दिवाळीत आपण दोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केल्यास आंतरिक दिवाळी साजरी केल्यासारखे होईल. अहंचे आवरण गेल्यावरच आनंद मिळतो. ‘मी बुद्धीमान असून मला कळते, इतरांना काही येत नाही’, ही अहंची लक्षणे आहेत. त्यापेक्षा ‘देव सर्व करतो. तोच आपल्यात राहून प्रत्येक कृती करतो, हे मान्य करायला हवे. ‘देवाविना आपण काहीच करू शकत नाही’, असा विचार सतत केल्यासच आपण आनंदी होऊ.

‘हे श्रीकृष्णा, तुला अपेक्षित असा दिवाळी हा सण आम्हाला साजरा करता येऊ दे, तसेच दिवाळीतील सर्व अपप्रकार नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच आम्हाला दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थनाआहे.’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.

Leave a Comment