दीपावली (दिवाळी)

मुलांनो, हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे ‘दीपावली’ साजरी करून देवतांची कृपा संपादन करा !

‘मित्रांनो, दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ किंवा रांग ! दिवा लावल्यानंतर काय होते ? जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण होतो. दीपावली म्हणजे आनंदी जीवनाचा प्रारंभ ! आपण ज्या पद्धतीने दीपावली साजरी करतो, त्यातून इतरांना दुःख आणि त्रास होतो. ते देवाला आवडेल का ? इतरांना आनंद होईल, अशी प्रत्येक कृती करणे, हीच खरी दीपावली !

१. ‘दीपावली’ या सणाचे विवेचन

१ अ. अर्थ : दीपावली म्हणजे दीप + आवली. या दिवशी सर्वत्र दिवे रांगेने लावले जातात.

१ आ. भावार्थ : श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, स्वार्थ, लालसा,अनाचार आणि दुष्ट प्रवृत्ती यांच्यापासून मुक्त केले अन् दैवी विचार दिले. श्रीकृष्णानेही आपल्याला ‘स्वतःतील दोष घालवून गुणांचे संवर्धन करून आनंदी जीवन जगावे’, असे सांगितले आहे.

१ इ. दीपावलीमागील इतिहास : १४ वर्षांचा वनवास पूर्ण केल्यानंतर श्रीराम अयोध्येला आले. त्यावेळी जनतेने दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून ‘दीपावली’ हा उत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला.

२. दीपावलीतील प्रत्येक दिवसाचे शास्त्रोक्त पद्धतीने केलेले विवेचन

२ अ. धनत्रयोदशी (धनतेरस) (आश्विन वद्य त्रयोदशी)

२ अ १. धनाची पूजा करणे : या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. मागील वर्षीची दिवाळी ते चालू वर्र्षाची दिवाळी असे व्यापारी वर्ष असते. नव्या हिशेबाच्या वह्या या दिवशीच आणल्या जातात.जीवनाचे पोषण सुरळीत चालू ठेवणार्‍या धनाचीही पूजा केली जाते. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी !

२ अ २. ‘अपमार्गाने कधीही पैसा मिळवणार नाही’, अशी प्रतिज्ञा करा : मित्रांनो, धन म्हणजे पैसा ! तो आपण चांगल्या मार्गाने मिळवायला हवा. दुसर्‍यांना फसवून, भ्रष्टाचाराने किंवा चोरी करून मिळवलेले धन हे धन होऊ शकत नाही. त्यातून आपल्यावर लक्ष्मीची कृपाही होऊ शकत नाही. ते पाप आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी ‘मी कधीही अपमार्गाने पैसा मिळवणार नाही’, अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करायला हवी.

२ अ ३. ‘सर्वांना धर्माच्या मार्गाने पैसा मिळवण्याची बुद्धी दे’, अशी प्रार्थना करा : आज देशात सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. अशांना धनाची पूजा करण्याचा अधिकार आहे का ? मित्रांनो, या दिवशी लक्ष्मीदेवीला प्रार्थना करा, ‘हे माते, अधर्माने पैसा मिळवण्याची वृत्ती या देशातून नष्ट होऊ दे आणि सर्वांना धर्माच्या मार्गाने पैसा मिळवण्याची बुद्धी होऊ दे.’ सध्या काही मुले वडिलांच्या खिशातून, तर काही मुले वर्गातील इतर मुलांच्या दप्तरातील पैसे चोरतात. अशा मुलांनी दिवाळी साजरी केली, तर त्यांच्यावर देवीची कृपा होईल का ? जर आपल्याकडून अशी चूक होत असेल, तर ती टाळण्याचा निश्चय करा. हीच खरी धनतेरस होय.

२ आ. धन्वंतरी जयंती (आश्विन वद्य त्रयोदशी)

२ आ १. बाहेरील असात्त्विक पदार्थ न खाण्याचा निश्चय करून प्रतिदिन सात्त्विक आहार ग्रहण करण्यातून धन्वंतरी देवीची कृपा संपादन करा : वैद्य या दिवशी ‘देवांचा वैद्य’ या भावाने धन्वंतरीचे पूजन करतात. त्या वेळी कडुनिंबाची पाने आणि साखर असा नैवैद्य दाखवला जातो. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. प्रतिदिन ५ – ६ कडुनिंबाची पाने खाल्ल्यास आपण निरोगी रहातो. सध्याची मुले आईने केलेली भाजी-पोळीही खात नाहीत. बाहेर मिळणार्‍या बर्गर, पिझ्झा, चॉकलेट इत्यादी खाद्यपदार्थांमुळे आरोग्य चांगले रहात नाही. धन्वंतरी ही आरोग्य देणारी देवता आहे. या दिवशी आपण घरचा सात्त्विक आहार घेण्याचा निश्चय केल्यास देवतेची कृपा होऊन आपले आरोग्यही चांगले राहील.

२ इ. यमदीपदान (आश्विन वद्य त्रयोदशी)


यमदीपदान
२ इ १. अपमृत्यू टाळण्यासाठी कणकेचे १३ दिवे दक्षिण दिशेला तोंड करून लावा : प्राणहरण करण्याचे कार्य यमराजांकडे आहे. कालमृत्यू कोणालाच चुकत नाही; पण अचानक मृत्यू कोणाला येऊ नये, यासाठी कणकेचे १३ दिवे दक्षिण दिशेला तोंड करून लावावेत. आपण कधीही दक्षिण दिशेला दिवा लावत नाही; मात्र या दिवशी आपण तशी कृती करतो.

२ ई. नरकचतुर्दशी (आश्विन कृ. चतुर्दशी)

5

नरकासुर वध

२ ई १. नरकासुराचा वधाची कथा

२ ई १ अ. श्रीकृष्णाने देव आणि मानव यांना त्रास देणार्‍या नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीवासातील राजकन्यांना मुक्त करणे : पूर्वी प्रागज्योतिषपूर येथे नरकासुर नावाचा असुर राज्य करत होता. तो देव आणि मानव यांना फार त्रास देऊ लागला. स्त्रियांनासुद्धा त्रास द्यायचा. त्याने १६ सहस्रराजकन्यांना तुरुंगात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत रचला. त्यामुळे सर्व लोकांमध्येभीती निर्माण झाली. हे वृत्त कृष्णाला समजल्यानंतर तो सत्यभामेसह तेथे गेला. त्याने नरकासुराचा वध करून सर्व राजकन्यांना मुक्त केले.

२ ई १ आ. नरकचतुर्दशीच्या दिवशी मंगल स्नान करणार्‍याला कोणतेही दुःख होणार नसल्याचा वर कृष्णाने नरकासुराला देणे : नरकासुराने कृष्णाकडे वचन मागितले, ‘या दिवशी जो कोणी मंगलस्नान करेल, त्याला कोणतेही दुःख होणार नाही.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. नरकचतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराला मारून स्वत:च्या कपाळावर रक्ताचा टिळा लावला. घरी आल्यावर सर्व स्त्रियांनी कृष्णाला ओवाळले. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून लोक पायाने कारीट ठेचतात.

२ उ. लक्ष्मीपूजन (आश्विन अमावास्या)


लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन

२ उ १. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी भक्तांघरी रहाण्यास येत असल्याने विविध गुण अंगी आणून तिचे भक्त व्हा : श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले, तोच हा दिवस ! या दिवशी एका चौरंगावर अक्षतांचे स्वस्तिक काढतात. त्यावर लक्ष्मी आणि कुबेर यांची प्रतिमा ठेवतात. लक्ष्मीला धने, गूळ, साळीच्या लाह्या आणि बत्तासे वहातात. धने हे धनवाचक असून लाह्या हे समृद्धीचे प्रतीक आहे. ‘त्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करून स्वतःला योग्य असे रहाण्याचे ठिकाण ती शोधते’, असे पुराणात सांगितले आहे. तिला कोणत्या ठिकाणी रहायला आवडते ? जे देवभक्त, सत्य बोलणारे, देवाला आवडेल असे वागणारे, तसेच ज्यांच्या प्रत्येक कृतीतून इतरांना आनंद मिळतो, अशांच्याच घरी देवीला रहायला आवडते. ‘आपल्या घरी देवीने रहावे’, असे तुम्हाला वाटते ना ? मग आपणही आपल्यात वरील गुण आणण्याचा निश्चय करणे, हेच खरे लक्ष्मीपूजन आहे.

लक्ष्मीपूजनाविषयी माहिती देणारे लघुपट पाहण्यासाठी येथे क्लिक करा​

२ उ २. कुबेर देवतेची पूजा करण्याचे महत्त्व : संपत्ती राखून ठेवण्यास, तसेच पैसा मिळवण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी व्यय करायला कुबेर ही देवता शिकवते; म्हणून आपण कुबेराच्या प्रतिमेची पूजा करतो.पुष्कळ व्यक्तींकडे पैसा येतो; पण तो कसा व्यय करावा आणि कसा राखावा, ते त्यांना कळत नाही.यासाठी कुबेराची पूजा केली पाहिजे.

२ उ ३. अलक्ष्मी निःसारण : आपण लक्ष्मीची पूजा करून तिला बोलावले; पण अलक्ष्मीचा नाश झाला, तरच लक्ष्मी रहाणार ना ? जसे गुण आले; पण दोष घालवले नाहीत, तर गुणांना महत्त्व राहील का ? नाही. मग या दिवशी नवीन केरसुणी घेऊन मध्यरात्री केर काढावा. कचरा म्हणजे अलक्ष्मी ! या रात्री तो कचराबाहेर नेऊन टाकतात. एरव्ही आपण कधीही रात्री केर बाहेर टाकत नाही.

२ ऊ. बलीप्रतिपदा (कार्तिक शु. प्रतिपदा)

बलीप्रतिपदा

बलीप्रतिपदा

२ ऊ १. बळीराजाप्रमाणे देवाला सर्वस्व अर्पण करा : या दिवशी आपण दानशूर बळीराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची पूजा करतो. दान नेहमी योग्य व्यक्तीलाच द्यायला हवे; पण बळीराजाने तसेन करता कोणी काही मागेल, त्याला दान दिले. काही अपात्र लोकांच्या हाती धन गेल्याने ते इतरांना त्रास देऊ लागले. शेवटी विष्णूने वामनावतार धारण करून बळीला पाताळात पाठवले. बळीने वामन अवताररूपी श्रीविष्णूला सर्वस्व अर्पण केले आणि तो देवाला पूर्णपणे शरण गेला. मित्रांनो, आपणही देवाला शरण गेल्यास त्याची कृपा होते.

२ ए. भाऊबीज (कार्तिक शु. द्वितीया)

२ ए १. जीन्स-पँट आणि टी-शर्ट यांपेक्षा बहिणीला पंजाबी पोशाख किंवा परकर-पोलके भेट द्या : भाऊबिजेच्या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने त्याला ओवाळावे. भाऊ नसेल, तर कोणत्याही एका पुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. या दिवशी पतीने आपल्या पत्नीच्या हातचे जेवण न घेता बहिणीकडे जेवायला जावे. बहिणीला आपण वस्त्रे भेट देतांना जीन्स-पँट आणि टी-शर्ट देणार का ? त्यापेक्षा तिला पंजाबी पोशाख, साडी किंवा बहीण लहान असल्यास परकर-पोलके द्यावे.

‘आपण आपल्या हिंदु संस्कृतीचे रक्षण करायचे आहे’, या भावाने त्या दिवशी कुर्ता-पायजमा किंवा धोतर-कुर्ता घालून बहिणीकडे जावे. या वेळी बहिणीला काळ्या रंगाचे कपडे देऊ नये.

३. विजेच्या आणि तेलाच्या दिव्यांची आरास करण्यातून होणारी हानी अन् लाभ

विजेच्या दिव्यांची आरास तेलाच्या दिव्यांची आरास
१.वातावरणातील देवतांचे चैतन्य चैतन्य आकर्षित करण्याची क्षमता नसल्याने काहीच लाभ न होणे वातावरणातील देवतांचे चैतन्य मिळून उत्साह जाणवणे
२. आकर्षणक्षमता डोळ्यांना केवळ आकर्षित करणे; पण मनाला उत्साह आणि आनंद न जाणवणे मनाला समाधान आणि शांती मिळणे
३. बहिर्मुखता / अंतर्मुखता बहिर्मुखता वाढून स्वतःच्या दोषांचा अभ्यास करण्यापेक्षा इतरांच्या दोषांकडे लक्ष जाणे अन् तणाव वाढणे अंतर्मुखता वाढून स्वतःच्या दोषांचा अभ्यास करता येणे
४. राष्टीय संपत्तीची बचत न होणे होणे

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.

दिवाळी या सणाविषयीची अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा !