मित्रांनो प्रदूषणमुक्त नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?

नवरात्रोत्सवामध्ये पुढील गोष्टी टाळाव्यात !

अ. थर्माकोलचा वापर टाळा : अनेकजण देवीचे मखर करण्यासाठी थर्माकोलचा वापर करतात. थर्माकोलपाण्यात विसर्जित होत नाही. तो अग्नीविसर्जन केल्यास वायू प्रदूषण होते. यास्तव थर्माकोलचा वापर टाळावा.

आ. फटाके वाजवू नका : मूर्ती आणतांना फटाके वाजवू नयेत. आपण ध्वनी-प्रदूषण केलेले देवीला आवडले का? फटाके लावल्याने देवीतत्त्व नष्ट होऊन वातावरण प्रदुषित होते.

इ. चित्रपटातील गाणी लावू नका : देवीसमोर चित्रपटातील गाणी लावली जातात. हे अयोग्य आहे. यामुळेलोकांच्या मनात भक्तीभाव जागृत होणार नाही. त्यामुळे आपण याला विरोध करायला हवा.

ई. हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करणे टाळा : मित्रांनो, चित्रपटाच्या गाण्यांवर गरबा खेळणे, हे चुकीचेआहे.यामुळे देवीविषयीचा भक्तीभाव वाढणार नाही. काहीजण गरबा खेळतांना हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करतात. मित्रांनो,या कृतींमुळे आपण देवीच्या कृपेला पात्र होणार नाही.

नवरात्रोत्सव पुढीलप्रमाणे साजरा करा !

अ. प्रदूषण विरहित आरास : मित्रांनो, आरास सिद्ध करतांना कागदांचा वापर करावा. फुले आणि पाने यांच्यातोरणांचा वापर करावा, असे केल्याने देवीची शक्ती आकृष्ट होऊन आपल्याला तिचा लाभ होईल.

आ. मूर्ती आणण्याची योग्य पद्धत : मूर्ती आणतांना ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ असा नामजप करावा. दुर्गामातेचाजयजयकार करावा. आपण अधिकाधिक नामजपकरून दुर्गामातेच्या शक्तीचा लाभ घेऊया.

इ. देवीची गुणगान करणारी गाणी लावा : भजने ऐकल्यावर लोकांच्या मनात देवीविषयीचा भक्तीभाव जागृतहोईल आणि लोकांना देवीची उपासना करण्यात आनंद मिळेल.

ई. देवीच्या स्तुतीपर भजनांवर आणि तीन टाळ्यांनीगरबा खेळा : गरबा खेळतांना देवीची स्तुती करणारीभजने लावून तीन टाळ्यांनी गरबा खेळावा.गरबा खेळतांना आपण स्वतःला विसरून देवीच्याभजनात रममाण व्हायला हवे.

मित्रांनो, आपण नवरात्रोत्सवातील अपप्रकार बंद करूया, विद्यार्थी दशेतील महत्त्वाची देवता सरस्वतीदेवीची कृपासंपादन करूया आणि ज्ञान अन् कला संपादन करूया, शास्त्रानुसार नवरात्रोत्सव साजरा करून लाभ घेऊया !’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरूजी), पनवेल.

Leave a Comment