शल्यचिकित्सा

इ.स. पूर्व चार सहस्र वर्षे या काळी झालेला जगातील पहिला सर्जन, शस्त्रकर्मी सुश्रुत एखादे शस्त्रकर्म करण्यापूर्वी आपली आयुधे उकळून घेत असे.
(वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १५२, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)

विच्छिन्न झालेले हाड पुन्हा जुळवणे !

ऋग्वेद ८-१-१२ नुसार इंद्राविषयी सांगतो, एतश राजाच्या मानेवर खालच्या बाजूस आणि छातीच्या वरच्या बाजूस जत्रु (क्लॅव्हिकल) नामक हाडावर जखम झाली असता, पीडा उत्पन्न होण्यापूर्वीच इंद्राने ते जोडले. विच्छिन्न झालेले हाड पुन्हा जुळविले.

आज आधुनिक विज्ञानाला समजलेले
खोटा पाय बसवण्याचे तंत्र वेदकाळात याहीपेक्षा प्रगत असणे !

ऋग्वेद १-११६-१५ नुसार पक्षाचा पंख तुटावा तसा खेल राजाची पत्नी विश्पला हिचा पाय युद्धात कापला गेला. तेव्हा रात्रीतच त्यांनी तिला नवा धातूचा पाय बसविला आणि शत्रूवर चालून जाण्यास पुन्हा समर्थ बनविले. वैदिक तंत्राने एका रात्रीत पाय बसविला आणि लगेचच (सद्यः) विश्पला राणीने युद्धामध्ये भाग घेतला, हे ध्यानी घेतले, तर वैदिक तंत्र आजच्यापेक्षा फारच पुढे होते, हे मानावे लागेल.
(वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. १२१, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)