अतीसूक्ष्म कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषीमुनी !


वेदकालानंतर अतीविशाल आणि अतीसूक्ष्म अशी कालगणना भारताने केली. ती महाभारत, पुराणे इत्यादि ग्रंथात समाविष्ट केलेली आढळते. श्रीमद्भागवत पुराणात ३/११ येथे पुढीलप्रमाणे कोष्टक दिलेले आहे.

१ अहोरात्र = ८ प्रहर = २४ तास

१ अह = १ रात्र = ४ प्रहर = १२ तास

६ नाडिका = १ प्रहर = ३ तास

२ नाडिका= १ मुहूर्त = १ तास = ६० मिनिटे

१५ लघु= १ नाडिका = ३० मिनिटे

१५ काष्ठा = १ लघु = २ मिनिटे = १२० सेकंद

५ क्षण = १ काष्ठा = ८ सेकंद

३ निमेष = १ क्षण = १.६ सेकंद

३ लव = १ निमेष = ०.५३ सेकंद

३ वेध = १ लव = ०.१७ सेकंद

१०० त्रुटि = १ वेध = ०.०५६ सेकंद

३ त्रसरेणु = १ त्रुटि = ०.०००५६ सेकंद

३ अणु = १ त्रसरेणु = ०.०००१९ सेकंद

२ परमाणु = १ अणु = ०.००००६३ सेकंद

१ परमाणु = ०.००००३२ सेकंद

श्रीमद् भागवताचा काळ इसवीसनपूर्व १ सहस्र ६५२ वर्षे आहे. तीन सहस्र वर्षांपूर्वी सेकंदाचा दशलक्षांश भाग भारतियांनी का शोधला असावा ? त्यांनी अतीवेग धारण केलेला असावा किंवा पेशीविभाजनसारख्या अतीसूक्ष्म हालचाली ते निरीक्षत असावे. दुसरे काही कारण संभवत नाही.

स्थळ आणि काळ जोडलेले असणे (स्पेस-टाइम-कंटिन्युअम), या विज्ञानाने मांडलेल्या अत्याधुनिक सिद्धांताचे बीज भारतीय प्राचीन विज्ञानात आहे !

तिसर्‍या शतकात ब्रह्मगुप्त नावाच्या ज्योतिष्याने पवित्रक (कालपुरुष) गणित मांडले.

संदर्भ :वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. ५५-५६, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

मुलांनो, पाश्चात्त्य वैज्ञानिकांनाही लाजवील, असा हिंदूंचा हा वैज्ञानिक इतिहास आहे. आपले महानऋषीमुनी, धर्म व संस्कृती यांचा सार्थ अभिमान बाळगा !

Leave a Comment