भारतमातेचा सुपुत्र श्रीराम आणि रामराज्य

श्रीरामाचे भारतमातेवरील प्रेम

‘राम-रावण युद्धात श्रीरामाने रावणाचा पराभव केला. श्रीरामाने लंकेचे राज्य बिभीषणाच्या हाती दिले आणि अयोध्येला परत जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणाला हे आवडले नाही. रुचले नाही. लक्ष्मण श्रीरामास म्हणाला, ‘‘आपण रावणावर स्वपराक्रमाने विजय मिळवला आहे. लंकेमध्ये स्वर्गसुख आहे. लंका स्वर्णमयी आहे. अयोध्येला काय आहे ? आपण अयोध्येला कशाला जायचे ? आपण लंकेतच राहू या.’’

तेव्हा श्रीरामाने उत्तर दिले,

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते ।जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ।।

अर्थ : लक्ष्मणा, लंका स्वर्णमयी आहे, हे मला ठाऊक आहे; परंतु माझी आई आणि माझी जन्मभूमी, म्हणजेच भारतमाता मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे.

आपण हनुमंताच्या अंतःकरणात श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांचे दृश्य पहातो. तसेच प्रभु रामचंद्रांच्या अंतःकरणात भारतमाता विराजमान होती; म्हणूनच श्रीराम भारतमातेचे सुपुत्र आहेत.

श्रीरामाने प्रजेच्या मनात देशाप्रती मातृभक्तीचा भाव निर्माण केल्यावर भारतात रामराज्य निर्माण होणे

श्रीरामाने अयोध्येस परत येऊन तेथील प्रजेच्या अंतःकरणात ‘हा देश (भारत) ही माझी माता आहे आणि मी तिचा सुपुत्र आहे’, हा भाव निर्माण केला आणि भारतात रामराज्य निर्माण झाले.’

(सदाचार आणि संस्कृति, जानेवारी २०११)