छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘बलीदानदिना’ च्या निमित्ताने…


हे हिंदुसुता, घे तूभरारी, पेटव हृदयात तुझ्या मशाल।

छत्रपती संभाजीच्या स्वाभिमानी बलिदानाची ।। १ ।।


छत्रपतींच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून फुटले गवताला भाले ।

उसळूनी अग्नीकल्लोळ अवघे इंच इंच पेटले ।। २ ।।


आला जो औरंग्या तुडवण्या या मातीतील हिंदुत्वाला ।

त्याच नराधमाला क्षात्रविरांनी इथे गाडले ।। ३ ।।


धर्मद्वेष्ट्यांनी मांडिला तोच उच्छाद, आली पुन्हा तीच वेळ ।

झाले अवमानित राष्ट्र आणि धर्म सर्व काळ ।। ४ ।।


म्हणून हो पुन्हा तू संभाजीसारिखा भवानीचा भुत्या ।

स्वधर्म अन् स्वराज्य रक्षण्या, आशीर्वाद घे रणचंडिकेचा ।। ५ ।।


घे तू आण, करशील भस्मसात ।

माजलेल्या या अनाचार अन् अधर्माला ।। ६ ।।


घे हिंदुसुता, घे तूभरारी, पेटव हृदयात तुझ्या मशाल।

छत्रपती संभाजीच्या स्वाभिमानी बलिदानाची ।। ७ ।।– कु. वसुधा कुलकर्णी, पुणे (फाल्गुन कृ. एकादशी, कलियुग वर्ष ५११२(३०.३.२०११)