फटाक्यांसारख्या कुप्रथांना नष्ट करणे, हीच खरी दीपावली !

‘विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता दीपावलीच्या सणाची वाट पहात असाल. ‘केव्हा एकदा परीक्षा संपून दीपावलीचा आनंद घेतो’, असे तुम्हाला वाटत असेल; पण मित्रांनो, सणाचा अर्थ ‘आपण आनंदी राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे’, असा आहे.

१. दीपावलीत आकाशकंदिल लावण्याचे महत्त्व

कंदिल हे आनंदाचे प्रतीक आहे. व्यक्ती, समाजआणि राष्ट्र यांचे जीवन आनंदी व्हावे, तसेच सर्वांचे जीवन आनंदाने दिपून जावे, यासाठी आपणआकाशकंदिल लावतो. कंदिल लावल्यावर अंधाराचा नाश होतो. आपण ‘दीपावलीच्या सणामधून इतरांनाआनंद मिळेल, अशी कृती करतो का’, याचे चिंतन करायला हवे. दुर्दैवाने याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.दीपावलीच्या निमित्ताने आपल्या एखाद्या कृतीने इतरांना दुःख होत असेल, तर आपण पापाचे भागीदारच होणार आहोत. तेव्हा आपण हे सर्व थांबवून देवाची कृपा संपादन करूया.

२. फटाक्यांच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन थांबवूया

दीपावलीत मुले देवतांची चित्रेअसणारे फटाके वाजवतात. देवतेचे चित्र म्हणजे प्रत्यक्ष देवताच. आपण फटाका पेटवतो, त्या वेळी त्याचित्राचे तुकडे होतात, म्हणजे आपण त्या देवतेची विटंबनाच करतो. लक्ष्मीचे चित्र असलेले, तसेच राष्ट्रभक्तांची चित्रे असणारे फटाके वाजवणे, यांतून आपल्याला पाप लागते. या दीपावलीला आपण असे फटाके विकत घ्यायचे नाही. असे फटाके विकत घेणार्‍यांना विरोध करणे आणि त्यांचे प्रबोधन करणे,हीच खरी देवाची भक्ती आहे. असे केल्याने तुमच्यावर देवाची कृपाच होणार आहे. मुलांनो, आपणआपल्या आई-वडिलांचे चित्र असलेले फटाके वाजवू का ? नाही ना, मग देवता तर आपणा सर्वांचेरक्षण करतात. आपल्याला शक्ती आणि बुद्धी देतात; म्हणून या दीपावलीला आपण हे विडंबन थांबवण्याचा निश्चय करूया.

३. दिवाळीत फटाके वाजवण्याला कोणताही शास्त्राधार नसणे

दिवाळीला फटाके वाजवण्यामागे कोणताच शास्त्राधार नाही. ही एक चुकीची रूढ झालेली प्रथा आहे. ही कुप्रथा आपल्याला बंद करायचीआहे. याविषयी आपण चिंतन करूया. फटाके वाजवण्याने इतरांना आनंद मिळतो का, नाही ना ? मगअशा प्रथांचे आपण अनुकरण का करावे ? उलट अशा प्रथांमुळे लोकांना आपले सण नकोसे झालेआहेत. त्यामुळे सणांविषयीचे अपसमज वाढत आहेत. ते दूर करणे, हीच खरी दीपावलीआहे. यासाठी लोकांना धर्मशिक्षण दिले पाहिजे.

४. फटाके वाजवण्याने होणारे घातक परिणाम

४ अ. शारीरिक दुखापत होणे : फटाक्यांमुळे अनेकांना शारीरिक दुखापत होते. डोळ्यांना लागणे किंवा भाजणे अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात. यातून दुसर्‍यांना दुःखच होते. मग इतरांना दुःखदेऊन आपण दीपावली साजरी करावी का ? हे पाप आहे.

४ आ. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना त्रास होणे : मोठे फटाके लावल्यामुळे होणार्‍या कर्णकर्कश ध्वनीमुळे लहान मुलांना भीती वाटते. त्यांच्या मनावर घातक परिणाम होतो. वृद्ध व्यक्तींनाही या ध्वनीने त्रास होतो. अशा पद्धतीने इतरांना त्रास देऊन आपण दीपावली साजरी करायची का ?प्रत्येकात देव आहे. अशा वागण्याने आपण प्रत्येकातील ईश्वरी तत्त्वाला दुःख देतो. तेव्हा हा विचारकरून हे टाळून आपण दीपावली साजरी करूया.

४ इ. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होणे : फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे त्रास होतात.तसेच ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, अशा लोकांचा त्रास वाढतो. त्यामुळे असे लोक या कालावधीत अशाठिकाणहून दुसरीकडे रहायला जातात. तेव्हा त्यांना त्रास होऊ नये; म्हणून आपण हे सर्व थांबवायला हवे.

४ ई. पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम : आपण ‘पर्यावरण’ या विषयाचा अभ्यास करतो.प्रत्येकानेच पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, हे आपल्याला ठाऊक आहे. दीपावलीच्या कालावधीत वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण अल्प होऊन ‘कार्बन-डाय-ऑक्साईड’चे प्रमाण वाढते. त्यामुळे लोकांना शुद्ध हवा मिळत नाही आणि पर्यावरणाचा र्‍हास होतो. तेव्हा आपण ‘पर्यावरण’ हा विषय केवळ गुण मिळवण्यासाठी शिकायचा का ?

४ उ. पैशांचा र्‍हास होणे : आज आपल्या देशातील जनता भ्रष्टाचार, गरिबी अशा अनेक गोष्टींनी त्रस्तआहे. अशा वेळी अयोग्य गोष्टींसाठी आपण आपला पैसा व्यय करायचा का ? फटाके वाजवणे, म्हणजेआपलाच पैसा जाळणे होय. हा पैसा आपण आपल्या शिक्षणासाठी व्यय करू शकतो. तेव्हा मित्रांनो, या दीपावलीपासून ‘फटाके विकत घेऊन राष्ट्राच्या संपत्तीची हानी करणार नाही’, असा निश्चय करूया.

४ ऊ. फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणातील सात्त्विकता नष्ट होऊन रज-तमाचे प्रमाण वाढणे :फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणातील सात्त्विकता नष्ट होऊन रज-तमाचे प्रमाण वाढते. त्यामुळे वातावरणातील ईश्वराचे चैतन्य नष्ट होते. आपण सणांच्या माध्यमातून सत्त्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. समाजातील सर्वसमस्यांचे मूळ कारण रज-तमाचे प्राबल्य हे आहे. तेव्हा हे आपण टाळूया.

तेव्हा मित्रांनो, या दीपावलीला ‘फटाके वाजवणार नाही’, असा निश्चय करूया.

५. मुलींनो, चित्रविचित्र रांगोळ्या काढण्यापेक्षा शास्त्रानुसार रांगोळी काढा

दीपावलीमध्येआपण घरापुढे रांगोळी काढतो. रांगोळीच्या माध्यमातून आपण देवतेला आवाहन करतो. रांगोळीशास्त्राप्रमाणे कशी काढावी, हे सनातनच्या ग्रंथात दिलेले आहे. आपल्याला शास्त्र ठाऊक नसल्यामुळेआधुनिक प्रथा किंवा पालट म्हणून मुली चित्रविचित्र रांगोळ्या काढतात. हे आपण थांबवायला हवे.मुलींनो, आपण या दीपावलीमध्ये शास्त्राप्रमाणेच रांगोळी काढण्याचा निश्चय करूया.

६. दीपावलीला विजेची रोषणाई आणि तमोगुणी मेणबत्तीचा
वापर करण्यापेक्षा तेलाच्यादिव्यांचा वापर करूया

दीपावलीत वातावरणात ईश्वरी चैतन्य फार मोठ्या प्रमाणात असते.तेलाच्या दिव्याच्या माध्यमातून ते आपल्या घरी येते आणि आपल्या घरातील वातावरण आनंदी होते.तेलाचा दिवा हा रज-तमाचा नाश करतो आणि सत्त्वगुणाची वृद्धी करतो, तर विजेची रोषणाई आणि मेणबत्ती यांनी वातावरणात रज-तमाची वृद्धी होते. असेहोऊ नये; म्हणून मुलांनो, दिवाळीत तेलाचा दिवा लावा आणि विजेची रोषणाई टाळा !

७. मुलांनो, भाऊबिजेला बहिणीला हिंदु संस्कृतीनुसार वस्त्रालंकार द्या

भाऊबिजेच्या दिवशीबहीण भावाला ओवाळते. तेव्हा भाऊ बहिणीला वस्त्रालंकार देतांना जीन्स पँट आणि टी-शर्ट असा खिस्त्यांचा पोषाख देतात. अशी भेट देणे, म्हणजे आपल्या बहिणीला हिंदु संस्कृतीपासून दूर नेण्यासारखेआहे. तेव्हा आपण आपल्या बहिणीला परकर पोलके, पंजाबी पोशाख, साडी असे सात्त्विक पोषाख देऊन हिंदु संस्कृतीचे रक्षण करूया !

विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आता प्रत्येक सणामागील शास्त्र समजून घ्यायला हवे. प्रत्येक सण शास्त्राप्रमाणे साजरा करायला हवा.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.