हल्लीच्या लोकांचा शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

‘१०-१५ वर्षांपूर्वी मी एका डॉक्टरांकडे गेले होते. (हे डॉक्टर एम्.एस्. झालेले आहेत.) त्यांच्याकडे कोणीतरी बसलेले असल्यामुळे मी बाहेर प्रतिक्षालयात थांबले. डॉक्टरांकडे त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ मुलासह आले होते.

मुलगा १२ वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे ते पेढे देण्यासाठी आले होते. चिकित्सालय छोटेच असल्यामुळे मला आतील संभाषण बाहेर ऐकू येत होते. तेव्हा त्यांच्यात पुढील संभाषण झाले.

डॉक्टर : पुढे काय करायचे ठरवले आहेस तू ?

मुलगा : मी अभियांत्रिकी व वैद्यकीय असे दोन्ही अर्ज भरणार आहे. अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला तर तिकडेच जाईन.

डॉक्टर : अरे, असे काय करतोस ? तू माझे ऐक. तू मेडिकलला प्रवेश घे. अरे, डॉक्टर म्हणजे खोर्‍याने पैसा. हे बघ, मी डॉक्टर झाल्यावर १-२ वर्षांतच माझे घर (बंगला), गाडी सर्वकाही झाले; पण हे सर्व करायला माझ्या इंजिनिअर भावाला १० वर्षे लागली.’

मुलांनो, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य हे सर्व क्षणभंगुर आहे. याउलट ज्ञान मात्र जन्मोजन्मी आपल्याला साथ देते.