ब्रिटिशांनी मेकॉलेपूर्वी भारतीय शिक्षणप्रणाली ब्रिटनमध्ये राबवायचा प्रयत्न करणे


‘वर्गप्रमुख, पाटी आणि गटचर्चा या संकल्पनांना आधुनिक शिक्षणपद्धतीत खूप महत्त्व आहे, असे आपण बघतो; पण मुळात या संकल्पना आल्या कुठून ?
तर या संकल्पना भारतियांच्या आहेत. १६२३ मध्ये ‘पेट्रो डेला वाले’ हा एक प्रवासी भारतात आला. त्याने इथली शिक्षणव्यवस्था बघितली. त्याने केलेल्या नोंदींमधे या सर्व व्यवस्थांचे वर्णन आहे.
इ.स. १८०० च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीचे डॉ. बेल आणि लँकेस्टर या दोघांनी ब्रिटनमध्ये वर्गप्रमुख, पाटी आणि गटचर्चा यांसारख्या शिक्षण संकल्पना राबवायचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये भांडण लागले की, श्रेय कुणाचे ? आणि मग त्या भांडणासंबंधीच्या चौकशीतून असे निष्पन्न झाले की, मुळात हे सगळे श्रेय भारतियांचे आहे. त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीचे एक अधिकारी ब्रिगेडीअर जनरल अलेक्झांडर वॉकर यांनी लिहून ठेवले आहे, `मलबारमधील भारतीय ब्राह्मणांकडे पाहिलेल्या या पद्धती अवर्णनीय आहेत.
शिक्षण देण्याच्या या पद्धतींमुळे समाजातील अत्यंत खालच्या स्तरापर्यंत अत्यंत लाभदायी पद्धतीने शिक्षण पोहोचवले जाते आणि या गोष्टींचा विचार आम्ही करायला पाहिजे.’ म्हणजे शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्येही किती प्रगती होती आणि काय दृष्टीकोन बाळगला जात होता, ते पहा. सर्वत्र शाळा होत्या. श्रीरंगपट्टनम् या ठिकाणच्या नोंदी सांगतात, ‘सर्व वर्गांतील लोक त्या ठिकाणी शिकायला येत असत आणि त्या विषयांमध्ये नौकानयन, वैद्यकीय शास्त्र, कायदा, न्याय असे सगळे विषय असत. त्याच्यामधे प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असेही विभाजन असे. ज्याला ज्या ठिकाणी, ज्या विषयाचे आणि जितके शिक्षण घ्यायचे तशी व्यवस्था असे.’
– डॉ. दुर्गेश सामंत, रामनाथी, गोवा (त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथे २६.४.२००७ या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती मंच’ची स्थापना करण्यात आली. त्या वेळी केलेले भाषण)

Leave a Comment