ब्रिटीशपूर्व काळातील भारत ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर असणे

मुलांनो हे अभिमानास्पद वास्तव जाणा !

ब्रिटीशपूर्व काळातील भारत ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर असणे

‘भारतातले ब्रिटीशपूर्व काळातील शिक्षण हे उत्कर्ष होणारे होते. याविषयी युरोपियन प्रवासी व शासनकर्ते यांच्या निःसंदिग्ध साक्षी आहेत. रामस्वरूप यांनी त्यांच्या Education System during Pre-BritishPeriod या प्रबंधात ही चर्चा केली आहे.’

अ. ‘ब्रिटीशपूर्व काळातील भारत हा ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर होता. आशिया व युरोप मध्ये अग्रणी होता. त्या काळी भारतात कुणीच निरक्षर नव्हते. याला प्रमाण म्हणजे मेगॉस्थेनिस (खि.पूर्व. ३०२) हा भारतातला प्रवासी इथल्या शिक्षणाने विलक्षण प्रभावीत झाला. मेगॉस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या दरबारी होता, तो भारतातील ज्ञान व शिक्षण यांची विलक्षण प्रशंसा करतो.

आ. ब्रिगेडियर जनरल अलेक्झांडर वॉकर ख्रिस्ताब्द १७८० ते १८१० पर्यंत हिंदुस्थानात नोकरीला होता. तो सांगतो, `हिदूं इतकी शिक्षणाची ज्वलंत जाण जगातल्या कुठल्याही लोकांना नाही. इ. सार्वत्रिक शिक्षणाची सर्व भारतभर सुव्यवस्था असल्याचे शिक्षणव्यवस्थेचे त्या काळचे युरोपियन निःसंदिग्ध वर्णन करतात. ख्रिस्ताब्द १८२० मध्ये Abbe J. A. Dubois सांगतो, “असे गाव सापडणे कठीण आहे की, जिथे शाळा नव्हत्या. विद्यार्थ्यांच्या गरजा पुरवणारे, त्यांच्या योग्यतेला अनुकूल असे शिक्षण असे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २००९)

इंग्रज भारतात येण्यापूर्वी त्यांच्या देशापेक्षा भारतात साक्षरता होती !

‘इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये ७ लाख ३२ सहस्र गुरुकुले होते. ९७ टक्के लोक सुशिक्षित होते. त्या वेळी शिक्षणक्रमात १८ विषय हे होते. त्यात आयुर्वेद, योग, आरोग्य, गणित, स्थापत्य अशा अनेक प्रकारच्या विषयांचा समावेश होता.

– अनंत गाडगीळ (लोकजागर, ऑक्टोबर २००९)

भारताच्या महान संस्कृतीचे आचरण करणारे पाश्चात्त्य !

पाश्चात्त्य समाज हिंदु धर्माने दिलेली भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, अध्यात्म, श्री भगवद्गीता इत्यादी अनेक बाबींकडे जागतिक देणगी म्हणून पहातो. अलीकडेच ‘युनेस्को’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने जागतिक अभ्यासक्रमात हिंदु धर्मातील तत्त्वे दर्शित करणारी काव्ये स्वीकारली आहेत. ही काव्ये विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी, तसेच युवापिढीतील कुसंस्कार, क्रौर्य आणि दुर्जनता नष्ट करण्यासाठी पूरक ठरतील, असे ‘युनेस्को’ने म्हटले आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांतील शिक्षणव्यवस्थेत संस्कृत भाषा अन् रामकृष्णादी अवतारांच्या कथांचे धडे अंतर्भूत आहेत. अमेरिकेच्या विद्यापिठात भगवद्गीतेचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला आहे.

भारतीय शिक्षणप्रणालीची ही शक्ती जाणा !

‘विद्यार्थ्यांनी व्रतस्थ असलेच पाहिजे. भारतीय शिक्षण-शास्त्रज्ञांचा तसा कटाक्ष आहे. आहार, केशभूषा, विहारादी बाबतीत कटाक्षाने व्रतस्थ असायलाच हवे. संयम सांभाळलाच पाहिजे. तसेच भारतीय अध्यापन संस्थांचे कठोर नियम होते. तिथे मनमानी नव्हती. मनमानी असेल, तिथे विद्या असंभव व जिथे विद्या, तिथे मनमानी अशक्य !

स्वामी रामतीर्थांसारखा असा दृढ आत्मविश्वास किती आधुनिकांत आहे ?

‘स्वामी रामतीर्थ अत्यंत बुद्धीमान विद्यार्थी होते. त्यांचा आवडीचा विषय होता गणित. शिकत असतांना त्यांचे नाव तीर्थराम होते. एकदा परीक्षेत १३ प्रश्न दिले होते आणि त्यातील केवळ ९ सोडवायचे होते. तीर्थरामाने १३ च्या १३ प्रश्नांची उत्तरे लिहून त्याखाली एक टीप लिहिली. ‘१३ ही उत्तरे अचूक आहेत. कोणतीही ९ तपासावीत.’ असा त्यांचा आत्मविश्वास दृढ होता.’

आम्हाला जॉर्ज वॉशिंग्टनची आवश्यकताच काय ?

‘आमची हिंदु मुले सत्यवचनी युधिष्ठिर आणि श्रीराम यांच्या चरित्रातून सत्याचा महिमा जाणतात. सत्य बोलायला शिकतात. अनृताचा (असत्याचा) तिरस्कार करतात. आम्हाला जॉर्ज वॉशिंग्टनची आवश्यकता काय ?’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १.१०.२००९)