रामराज्यात शिक्षण कसे होते ?

श्रीरामाने स्वतंत्र शिक्षण देऊन घराघरात श्रीराम निर्माण केले होते !

रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते. त्यावेळचे लोक निर्लोभी, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि कृतीशील होते. क्रियाशून्य नव्हते. जेव्हा बेकारभत्ता मिळतो तेव्हा क्रियाशून्यता येतेच. त्याकाळी लोक स्वतंत्र होते. कारण, शिक्षण स्वतंत्र होते, शिक्षण राज्याश्रित आणि वित्ताश्रित नव्हते. शिक्षण आणि शिक्षण देणारे दोन्ही पराधीन (गुलाम) असतील, तर त्या शिक्षणातून काय निर्माण होणार ? जे पेरलेले असते तेच उगवते. त्यात भेद होणार नाही.

श्रीरामाने स्वतंत्र शिक्षण देऊन घराघरात श्रीराम निर्माण केले होते. जेथे शिक्षण राज्याश्रित किंवा वित्ताश्रित असेल, तेथे कधी काळी स्वतंत्र श्वासोच्छ्वास नसेल. तेथे राष्ट्रीय चारित्र्याचे पुनरुत्थान नसेल.

लोकांना विशिष्ट शिक्षण मिळाल्याने ‘राष्ट्रीय चारित्र्य’ उभे राहिले !

‘माणसाला केवळ कर्तव्य परायणच नाही, तर लोभ विवर्जितही बनवण्यात आले होते. आपण एकच कर्तव्याचा घोष करीत असतो; पण कर्तव्य परायणता येत नाही. म्हणून श्रीरामाने लोकांना विशिष्ट शिक्षण देऊन ‘राष्ट्रीय चारित्र्य’ उभे केले होते’.

संदर्भ : व्यासविचार, नववा स्कंध

समाज आपल्या सुख आणि हिताची कल्पना यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु ते कशा रितीने प्राप्त होते, याची जाणीव त्याला नसते. ही जाण श्रीरामाला पूर्णपणे असल्यामुळे त्याने त्या काळात लोकांना साधनेद्वारे धर्माधिष्ठीत विशिष्ट शिक्षण देऊन ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करणारे शिक्षण दिले होते. त्यामुळे ‘राष्ट्रीय चारित्र्य’ निर्माण झाले होते.

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment