अतिथी देवो भव !

‘आपल्याजवळ अन्न थोडे असले, तरी त्यातील काही भाग दारी आलेल्या अतिथीला द्यावा’, हे औदार्य शिकवणारी हिंदु संस्कृती !

‘पूर्वी शिजवलेले अन्न विकत नसत. तेव्हा भोजनालये नव्हती, तर धर्मशाळा होत्या. जे पांथस्थ यात्रा करीत, ते मध्यान्हीला जेथे असत, तेथेच ‘अतिथी’ या नात्याने ‘ॐ भवति भिक्षां देहि । (हे माते, मला भिक्षा वाढ.)’ अशी प्रार्थना करायचे. ‘आपल्याजवळ अन्न थोडे असले, तरी त्यातील काही भाग दारी आलेल्या अतिथीला द्यावा’ हे औदार्य भारतियांमध्येच सापडते.