तिथीचे महत्त्व जाणा !

हिंदूंचे पंचांग कसे आहे ?

हिंदु कालगणनेचे पंचांग हे तिथीनुसार आहे. त्यानुसार एका मासात दोन पंधरवडे (पक्ष) येतात. पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत दुसरा पंधरवडा हा शुक्ल पक्ष असतो. प्रत्येक पक्षात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत १४ तिथी आणि पंधरावा दिवस अमावास्येचा किंवा पौर्णिमेचा येतो.

इंग्रजांची पाश्चात्त्य कालगणना

इंग्रज भारतावर राज्य करू लागल्यावर भारतियांना पाश्चिमात्य दिनदर्शिकेची ओळख झाली. इंग्रजांनी त्यांच्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी इंग्रजी कालगणनेचा वापर सर्वत्र चालू केला. पुढे इंग्रजांनी भारतभर एकछत्री अंमल उभारला, शिक्षणाचा प्रसार केला. त्यामुळे संपूर्ण भारतभर इंग्रजी शासकीय कारभारात त्यांच्याच दिनदर्शिकेचा वापर होऊ लागला.१९ व्या शतकातील भारतातील शिकलेली पिढी ही इंग्रजी शिक्षणाने भारावलेली असल्याने इंग्रजी कालगणनेचा वापर वाढला.

हिंदूंच्या कालगणनेचे महत्त्व

हिंदूंची तिथीनुसार असणारी कालगणना ही विश्वातील सर्वांत प्राचीनकालगणना आहे. त्यानंतर जगातील सर्व दिनदर्शिकांची निर्मिती झाली आहे.हिंदु संस्कृती ही वेदनिर्मित म्हणजेच अपौरुषेय, ईश्वरनिर्मित असल्याने ती शास्त्रशुद्ध आणि परिपूर्ण आहे.हिंदु संस्कृती ही ईश्वरनिर्मित असल्याने चैतन्यमय आहे आणि व्यक्तीचे सर्वांगीण हित साधणारी आहे !

कालगणनेचे वैशिष्ट्य

खिस्ताब्द १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष आणि सौरचांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. मात्र यात एक समान धागा आहे. सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. वर्ष बारा महिन्यांचे असावे, असे प्रथम कोणी सांगितले आणि जगाने ते कसे मान्य केले ? जगात अनेक पंचांग आहेत. त्यानुसार विविध वर्षांरंभ आहेत. मात्र सर्व पंचांगांतील एक वर्ष हे १२ महिन्यांनीच विभागले गेले आहे. या बारा महिन्यांचा सर्वांत प्राचीन उल्लेख प्रथम वेदांत आढळतो. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात आहे. वेदांनी सांगितले आणि ते जगाने मान्य केले !

तिथीनुसार वाढदिवस किंवा सण साजरे करण्याचे महत्त्व !

तिथीनुसार वाढदिवस, जयंती साजरी करावेत; कारण त्या विशिष्ट तिथीला त्या व्यक्तीच्या किंवा महत्पुरुषाच्या स्पंदनांशी मिळत्याजुळत्या लहरी पृथ्वीवर येतात आणि त्या लहरींचा त्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. तिथीनुसार एखादी गोष्ट करण्याचे महत्त्व यावरून लक्षात येईल !

हिंदूंचे सण विशिष्ट तिथीलाच दरवर्षी येतात. त्यामुळे सण हे ‘तिथी’नुसार साजरे केले जातात. त्या विशिष्ट तिथींना त्या सणांशी संबंधित देवतांच्या लहरी पृथ्वीवर येतात आणि त्या त्या देवतेचे हे तत्त्व लहरींच्या रूपाने पृथ्वीवर त्या ठराविक कालावधीत अधिक प्रमाणात येते. जे जीव भक्तीभावाने आणि धर्मशास्त्रानुसार सण साजरे करतात त्यांना त्या लहरींचा लाभ होऊन देवतेचे चैतन्य मिळते !

मुलांनो, तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आणि आपली जन्मतिथी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

जगातील सर्वश्रेष्ठ अशा हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगा !

तिथीचे वरील शास्त्र लक्षात घेतले, तर हिंदु संस्कृतीचे पंचांग किती परिपूर्ण, सखोल चिंतनात्मक आणि शास्त्राभ्यानुसार करण्यात आले आहे, हे लक्षात येईल. हे जाणल्यावर कोणा हिंदूचा उर अभिमानाने भरून येणार नाही ?हिंदूंनो, सध्या आपण वापरात असलेले इंग्रजी पंचांग हे केवळ २ सहस्त्र १० वर्षांपूर्वीचे आहे, तर वेदकालीन हिंदु संस्कृतीचे पंचांग हे १ अब्ज ९५ कोटी ५८ लक्ष ८५ सहस्त्र ११० वर्षे इतक्या वर्षांपूर्वीचे आहे. यावरून ऋषीमुनींच्या आपल्या प्राचीन हिंदु संस्कृतीची महानता लक्षात येईल !

आपल्या संस्कृतीसाठी एवढे कराच !

१.आपलावाढदिवस तिथीनुसार साजरा करा !

२.थोर पुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या तिथीनुसारच साजर्‍या करा आणि तसे करण्यासाठी इतरांनाही उद्युक्त करा !

३.भारताचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन तिथीनुसार साजरा करा !

४.नववर्षारंभ १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच साजरा करा !

Leave a Comment