Menu Close

डीएजी मॉडर्न (मुंबई) : चित्रप्रदर्शनातील म.फि. हुसेन यांच्या चित्रांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून पोलीस ठाण्यात तक्रार !

फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथील २० व्या शतकातील भारतीय कला या नावाने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.…

मलेशियातील हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड केल्याची ६ वी घटना !

मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सांगवी (पुणे) येथे देवतेचे विडंबन करणारा फलक पालटला !

पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला.

ऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे लेगिंन्सवर छापून विडंबन !

रेड बबल या ऑस्ट्रेलियातील प्रतिदिन वापरातील साहित्याची ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने लेगिंन्सवर (मुलींची तंग विजार) ब्रह्मा, श्रीविष्णु, शिव, श्रीकृष्ण, गणेश, दुर्गादेवी, लक्ष्मीदेवी, स्कंध, सरस्वतीदेवी, हनुमान,…

चेन्नई येथे हिंदुद्वेषी माजी प्रशासकीय अधिकार्‍याच्या श्रीरामाविषयीच्या अश्‍लाघ्य वक्तव्याच्या विरोधात उपोषण !

माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ख्रिस्तोदास गांधी यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी तंदी वृत्तवाहिनीवर आयोजित एका परिसंवादात भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. श्रीरामाच्या प्रतिमेला चपलेने मारले,…

ठाणे पोलिसांकडून देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

दिवाळीत उडवण्यात येणार्‍या फटाक्यांमध्ये देवतांची चित्रे असलेले आणि १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके विक्री करणारे, तसेच ते उडवणारे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले…

क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळाकडून श्री गणेशाचे विडंबन

क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळावरून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री केली जात आहे. श्री गणेशाच्या या विडंबनाविषयी अनेक…

नदीपात्रातील अपुर्‍या पाण्यामुळे होणारी विटंबना टाळण्यासाठी भाविकांकडून मूर्तींचे जलाशयात विसर्जन !

नंदुरबार – अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथील तापी नदीच्या पुलावर हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला प्रतिसाद देऊन ९० टक्के भाविकांनी गणेशमूर्तीचे गौतमेश्‍वर मंदिराजवळील जलाशयाच्या…

अज्ञातांनी तलावाबाहेर काढून ठेवलेल्या गणेशमूर्तींचे धर्माभिमान्यांकडून पुन्हा तलावात विसर्जन !

अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाझर तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. काही अज्ञातांनी या मूर्ती तलावाबाहेर काढून ठेवल्या होत्या. ही गोष्ट केर्ले गावातील…

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या…