Menu Close

बाळाचे इस्लामी नाव ठेवण्यास नकार देणार्‍या हिंदु सुनेला सासरच्या मुसलमान कुटुंबियांकडून अमानुष मारहाण

मुसलमानाने तो हिंदु असल्याचे भासवून पीडित महिलेशी केला होता विवाह !

हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने अन्वेषण करून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, जेणेकरून असे फसवणुकीचे प्रकार परत घडणार नाहीत ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

इंदूर (मध्यप्रदेश) –  आपल्या नवजात बाळाचे इस्लाम धर्मावर आधारित नाव ठेवणार नसल्याचे सांगितल्याने हिंदु सूनेला सासरच्या मुसलमान कुटुंबियांनी अमानुष मारहाण केली. तसेच पतीने तिला मित्रांकरवी बलात्कार आणि हत्या करण्याचीही धमकी दिली. पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा पती शाहीद अहमद, सासू शबनम, नणंद सानिया आणि त्यांचे नातेवाईक वसीम अख्तर, नौमन आणि फैजल खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी पती, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे.

१. या प्रकरणातील पीडित महिला आणि तिचा पती शाहीद हे दोघे वर्ष २०१९ मध्ये एका ‘कॉल सेंटर’मध्ये एकत्र काम करत होते. त्यावेळी शाहीदने तिला तो हिंदु असून त्याचे नाव राज असल्याचे सांगितले.

२. दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत पीडितेने राजच्या घरी भेट दिली असता तो मुसलमान असून त्याचे नाव शाहीद असल्याचे तिला कळले. त्यामुळे ‘हे लग्न होऊ शकत नाही’, असे पीडित महिलेने स्पष्ट केले; मात्र शाहीदने लवकरच तो हिंदु धर्माचा स्वीकार करणार असल्याचे वचन तिला दिले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

३. लग्नानंतर प्रारंभीचे काही दिवस सर्व सुरळीत होते; मात्र पीडित महिलेने मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांच्यात वाद उद्भवला. पीडित महिलेला हिंदूंमध्ये प्रचलित असलेले नाव बाळाला द्यायचे आहे, तर सासरच्यांना मुलाचे इस्लामनुसार नाव ठेवायचे आहे.

४. सासरच्यांकडून बळजोरी होऊ लागल्यानंतर पीडितेने शाहीदला त्याच्या आश्‍वासनाची आठवण करून दिली. त्यानंतर पीडित महिलेचा सासरच्यांनी छळ चालू केला. तिला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात  

Related News