Menu Close

धर्मांध मुसलमानांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण !

  • ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाण्याचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर स्टेटस ठेवल्याचा राग !

  • शिरच्छेद करण्याची दिली धमकी !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे धर्मांधांना अधिक मोकळीक मिळते, हेच यातून लक्षात येते ! अशांवर काँग्रेसवाले कारवाई करणार नाहीत; कारण त्यांची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट होय ! -संपादक

(स्टेटस ठेवणे म्हणजे एखादी माहिती किंवा चित्र प्रदर्शित करणे)

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार केली

जोधपूर (राजस्थान) – येथे व्हॉट्स अ‍ॅपवर ‘द केरला स्टोरी’चे स्टेटस ठेवण्यावरून बजरंग दलाचा कार्यकर्ता अभिषेक सरगरा याला धर्मांधांकडून मारहाण करण्यात आली. अली, अमन आणि पिंटू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी अभिषेक याला शिरच्छेद करण्याची धमकीही दिली आहे.

आरोपींना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार ! – विहिंप

अभिषेक याने स्टेटसमध्ये लिहिले होते, ‘द केरल स्टोरी’ एक चांगला चित्रपट आहे. स्वतःचे धर्मांतर होण्यापासून रोखण्यासाठी जगातील प्रत्येक तरुणीने हा चित्रपट  पहायला हवा.’ यावरून अली, अमन आणि पिंटू यांनी अभिषेक याला रात्री घरी जातांना वाटेत रोखले आणि ‘तू आमच्या धर्माला अपकीर्त का करत आहेस ?’ असे विचारले. त्यावर अभिषेक याने सांगितले, ‘मी ठेवलेल्या स्टेटसमध्ये चुकीचे काय आहे ?’ या वेळी त्यांच्याकडे स्वतःचा भ्रमणभाष संच नव्हता म्हणून तो या तिघांना घरी घेऊन गेला आणि तेथे त्याने भ्रमणभाषमधील स्टेटस दाखवले; मात्र त्यावर या तिघांनी त्याला मारहाण केली आणि ते पळून गेले. यानंतर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार केली अन् तिघांच्या अटकेची मागणी केली. या वेळी विहिंपचे नेते जितेंद्र शर्मा म्हणाले की, आम्ही आरोपींना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *