Menu Close

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोनाविषयी माहिती लपवल्याचे उघड

बीजिंग (चीन) – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूची माहिती मिळाल्यानंतर तो विषाणू ७ दिवस चीनमध्ये पसरू दिला. त्याविषयी त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही, अशी माहिती चिनी सरकारच्या अंतर्गत कागदपत्रांतून उघड झाली आहे.

१. ‘एसोसिएटेड प्रेस’च्या वृत्तानुसार, ‘चीनच्या आरोग्ययंत्रणांनी १४ जानेवारीलाच कर्मचार्‍यांना कोरोनाच्या साथीचा सामना करण्याचा आदेश दिला होता; परंतु प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेला सतर्क केले नाही.

२. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी २० जानेवारीला या विषाणूविषयी लोकांना सांगितले. तोपर्यंत ३ सहस्रांंहून अधिक लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले होते. वुहानमधीले डॉक्टर आणि परिचारिका यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे संकेत डिसेंबर २०१९ मध्ये दिले होते; परंतु अधिकार्‍यांनी त्या डॉक्टर आणि परिचारिका यांची बोलती बंद केली, तसेच काही डॉक्टरांना शिक्षासुद्धा करण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *