Menu Close

नवी मुंबई येथील शिक्षकांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ शिबिर

हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी मार्गदर्शन करतांना

नवी मुंबई : सध्या अतिमहत्त्वाकांक्षा, हव्यास आणि चुकीची मूल्ये समाजात रुजली आहेत. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचा नकारात्मक परिणाम शिक्षकांवरही होत आहे. त्यामुळे शिक्षकांनाही शिकवतांना दडपण येते. या आणि अशा प्रकारच्या तणावमुक्तीसाठी साधना करणे अत्यावश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी व्यक्त केले. ७ मे या दिवशी नवी मुंबईतील शिक्षक-शिक्षिकांनी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या शिबिराचा लाभ घेतला. त्या वेळी वैद्य धुरी बोलत होते.

‘पालकांचाही शिक्षकांवरील विश्‍वास न्यून होत आहे, सरकारी धोरणेे आणि शिक्षकांचे अतिरिक्त काम प्रतिदिन वाढत आहे. समवेत घरातील ताणतणाव आहेच. ५० वर्षांपूर्वी शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती होती. ते मुलांना रागावू शकत होते, गुरुजी जे सांगतील त्यावर पालकही विश्‍वास ठेवत; मात्र आता काळ पूर्ण पालटल्यामुळे असे होत नाही. यामुळे अद्ययावत रहाणे, स्वतःमध्ये सकारात्मक पालट घडवणे, स्वभावदोष न्यून करणे हे साधनेनेच शक्य आहे’, असेही वैद्य धुरी म्हणाले.

या वेळी उपस्थितांनी कुलदेव आणि कुलदेवी यांच्या नामजपाचे महत्त्व जाणून घेतले आणि ‘नामजप करू’, असे शिक्षिकांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *