Menu Close

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना हटवून दुसर्‍यांची नियुक्ती करा ! : महंत धर्मदास

राममंदिराचे पक्षकार महंत धर्मदास यांची भाजप सरकार आणि काँग्रेस यांच्याकडे मागणी

काँग्रेस असो कि भाजप त्यांना राममंदिर व्हावे, असे वाटत नाही. त्यामुळे अशी मागणी कधीही पूर्ण होणार नाही, असेच हिंदूंना वाटते !

अयोध्या : राममंदिराच्या बांधणीसाठी न्यायालयातील खटल्याचे पक्षकार महंत धर्मदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, तुम्ही सर्व खासदारांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना हटवून तेथे अन्य सरन्यायाधिशांची नियुक्ती करावी, त्यामुळे राममंदिराच्या संदर्भातील खटल्यावर लवकर निर्णय होईल.

महंत धर्मदास म्हणाले की, सरन्यायाधिशांना या प्रकरणात स्वारस्य असल्याचे  दिसत नाही. त्यामुळे ते यावर ठोस पाऊल उचलत नाहीत. मागील सुनावणीच्या वेळीच त्यांनी हे प्रकरण तातडीचे नसल्याचे सांगत मागे ठेवले होते. यावरून स्पष्ट होते की, त्यांना हा खटला पुढे नेण्यामध्ये स्वारस्य नाही. त्यांनी हा खटला तातडीने निकाली काढण्याच्या आम्हा पक्षकारांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर महाभियोग आणून त्यांना पदावरून हटवावे आणि दुसर्‍यांना सरन्यायाधीश बनवावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *