Menu Close

हिंदु धर्मावरील आघात जाणण्यासाठी सरवली गाव, भिवंडी येथील धर्मजागृती सभेला उपस्थित रहा ! : श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे आवाहन 

Aparna_Ramtirthakarभिवंडी : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु धर्मावरील आघात जाणण्यासाठी या सभेला उपस्थित रहा, असे आवाहन श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. येथील सोनाळे गावात आयोजित भिवंडी आगरी महोत्सव २०१६ च्या दुसर्‍या दिवशी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

या वेळी त्या पुढे म्हणाल्या…

१. संतांच्या पुण्यभूमीत उच्च अशा हिंदु धर्मात माझा जन्म झाला, हे मोठे भाग्य आहे. परमेश्‍वराने जर मला पुढे कधी विचारले की, तुला पुढचा जन्म कुठे देऊ ? तर मी त्याला बजावून सांगेन की, ज्या भारत देशाला आई मानले जाते, ज्या देशात आई, वडील आणि गुरुजन यांना देव मानले जाते आणि ज्या भारतातील कुटुंबव्यवस्था संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे, अशा भारतात कट्टर धर्माभिमानी हिंदू म्हणून पुनःपुन्हा जन्माला घाल !

२. एक आवाज आजही मला ऐकू येतो. त्यामुळे मला रात्री झोप येत नाही, तो आवाज आहे, भारतीय संस्कार, संस्कृती अन् कुटुंबव्यवस्था या सगळ्यांची मृत्यूघंटा वाजायला लागली. आज आपण सगळे जण शेवटच्या टप्प्यात आहोत. असेच चालू राहिल्यास पुढच्या १० वर्षांत एकही घर अस्तित्वात असणार नाही.

३. आज शिक्षणाने आपल्याला काय दिले ? नम्रता, समंजसपणा तर दिला नाही, माणसे जपायलाही शिकवले नाही. केवळ चांगले वेतन देऊन अहंकारी बनवले.

४. पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता आपल्या मुलींना मुलगी असल्याची जाणीव करून द्या. स्त्रियांनी झाशीची राणी अथवा राणी चेन्नम्मा यांच्यासारखा पुरुषार्थ गाजवायचा असतो. पाश्‍चात्त्यांसारखे तोकडे कपडे घालू नका. ‘मम्मी’, ‘डॅडी’ यांच्यापेक्षा ‘आई-बाबा’ म्हणून आपली संस्कृती जपा.

५. आपण मुलींना लहानपणापासून धर्म शिकवत नसल्यानेच त्यांचे आज मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. मुलींच्या भोवती धर्माचे कवच निर्माण करा. मुलींना धर्मशिक्षण द्या; कारण ती हिंदूंची जननशक्ती आहे आणि पुढच्या पिढीची धरोहर आहे !

क्षणचित्रे

१. शेवटी श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी काही महिलांना व्यासपिठावर बोलावले आणि शुद्ध हळदीपासून बनवलेले रसायनविरहित सनातन निर्मित कुंकू वापरण्याचे महत्त्व सांगितले. एका महिलेला इतरांना कुंकू लावण्यास सांगितले.

२. कार्यक्रमस्थळी अनेक महिला नऊवारी साडी आणि लहान मुले पारंपारिक हिंदु वेशभूषा परिधान करून आल्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.

२९ जानेवारी या दिवशी भिवंडी येथे हिंदु धर्मजागृती सभा !
 स्थळ : सरवली गाव, भिवंडी
 वेळ : सायंकाळी ६

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *