Menu Close

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ व्हावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीची राज्यव्यापी मोहीम.

आगामी विधानसभा अधिवेशनात कठोर, अजामीनपात्र कायदा व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ७५ हून अधिक ठिकाणी निवेदने प्रस्तुत


गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘बेकायदेशीर धर्मांतर’ यांसारख्या गंभीर समस्यांविरोधात कायदा करण्यासाठी महाराष्ट्रभर जाहीर निषेध मोर्चे काढले आहेत. त्यावेळी या प्रकरणाचे गांभीर्य समजून ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण दुर्दैवाने आजही या घटना थांबलेल्या नाहीत उलट त्यांची तीव्रता आणि क्रौर्य वाढतच आहे. आता सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर येत्या अधिवेशनात दोषींना जन्मठेपेची शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र ‘लव्ह जिहाद’ आणि बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यभरात निवेदन सादर

या संदर्भात समितीने माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री यांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ७५ हून अधिक ठिकाणी स्थानिक जिल्हा व तहसील प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवेदने सादर केली.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, नागपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदनाद्वारे वरील मागण्या मांडल्या.

जत (सांगली)

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देताना उपस्थित हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या व सरपंच सौ.संगिता लेंगरे

रत्नागिरी

उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे साधक

चिपळूण

डावीकडून तहसीलदार प्रवीण लोकरे, आदित्य जोशी, अमित जोशी, प्रशांत उतेकर, राजेश ओतारी, डॉ. हेमंत चाळके यांना निवेदन देताना

खेड

येवला (नाशिक)

येवला (नाशिक) येथील तहसीलदारांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीच्या महिला शाखा ‘रणरागिणी’ व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधी

सांगली

भाजपचे आमदार श्री. सांगलीत गोपीचंद पडळकरजी यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीच्या महिला शाखा ‘रणरागिणी’च्या महिला प्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

सिंधुदुर्ग

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते

खालापुर (रायगढ)

खालापूर (रायगड) तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीच्या महिला शाखा ‘रणरागिणी’ व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधी

बत्तीसशिराळा (सांगली)

भाजपचे आमदार श्री. बत्तीशिराळा (सांगली) येथे सत्यजित देशमुख यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

Latest News