येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥ विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा … Read more

विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविधतापा ।
संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥

विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविधतापा । संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥ बाळपणीं नाठविले ॥ व्यर्थ तारुण्य गेलें ॥ जरा हे दु:ख मोठे ॥ पुढे ठाकुनि आले ॥ विठ्ठला. ॥ १ ॥ भक्तीचा लेश कांही ॥ सत्यमागम नाही ॥ परिणामीं काय आतां ॥ शरण आलों तुझें पायी ॥ विठ्ठला ॥ २ … Read more

जय देव जय देव जय दत्तात्रेया ।
आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥

विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले । अनुसयेचें सत्त्व पाहावया आले ॥ तेथें तीन बाळक करुनीं ठेवीले । दत्त दत्त ऎसे नाम पावले ॥ १ ॥ जय देव जय देव जय दत्तात्रेया । आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥ त्रिदेवांच्या युवती परि मागों आल्या । त्यांसि म्हणे ओळखुनी न्या आपुल्या पतिला ॥ कोमल शब्दें करुनी करुणा … Read more

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।
नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

कृष्णापंचगंगासंगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमना । तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥ जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥ वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान । मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥ वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन । अंत्यवक्रें वदवी … Read more