जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।। दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद … Read more

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्भावे आरती,परिपूर्णकामा ।। धृ० ।। प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला । मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला … Read more

जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ० ।।

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १ ।। जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ० ।। कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण शितिकंठ निळा । ऐसा शंकर … Read more

जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।।

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। … Read more