आरती श्रीरामदासस्वामींची

ओंवाळू आरती सद्गुरु रामदास राणा ।
पंचही प्राणांचा दीप लाविला जाणा ॥ ध्रु० ॥

अज्ञानतिमिरज्योति सद्गुरु उजळल्या वाती ।
ज्ञानबोध प्रकटला तेणें प्रकाशली दीप्ती ॥ १ ॥

निर्गुण निरंजन ज्योति सद्गुरु रामदास ।
दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस ॥ २ ॥